अभिनेत्रीने अमिताभ  बच्चन यांनी तिला  उचलून घेतल्याचा  किस्सा सांगितला. 

अमिताभ यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. लवकरच ते 'कल्कि 2898 AD' मध्ये दिसणार आहेत.  यात ते 'अश्वथामा'च्या  रोलमध्ये आहेत.

मणिरत्न यांच्या 'रोजा' चित्रपटाने अभिनेत्री मधुला ओळख मिळवून दिली. अलीकडेच तिने एक जुना किस्सा सांगितला.

बॉलिवूड स्टार्स एक चॅरिटी सामना खेळले. अभिनेत्री मधु सुद्धा त्या मॅचमध्ये होती. बॉलिवूड बबलशी बोलताना तिने हे सांगितलं. 

मधु ज्या टीममध्ये होत, त्याचे कॅप्टन अमिताभ बच्चन होते. हैदराबादच्या स्टेडियममध्ये  मॅच होती. 5 हजार लोक  सामन्याला होते.

या मॅचमध्ये मी 2 धावा काढल्याच मधुने सांगितलं. माझ्यासाठी हजारो लोकांनी टाळ्या वाजवलेल्या. 

जिंकल्यानंतर अमिताभ यांनी मला उचलून घेतलं. नंतर पूर्ण स्टेडियमला राऊंड मारली.  मधु हेमा मालिनीची  चुलत बहिण आहे.