89 वर्षाच्या वडील सलीम खान यांच्या फिटनेसवर सलमान फिदा, सांगितली दिनश्चर्या

28 June 2025

Created By: Atul Kamble

नेटफ्लिक्सवरच्या दि ग्रेट इंडियन कपिल शोचा पहिला गेस्ट सलमान खान बनला,त्याने पर्सनल लाईफबद्दल सांगितलं

सलमान पापा सलीम खान यांची फिटनेस आणि हेल्थ रुटीन इन्स्पायर करणारी असल्याचे म्हणाला

८९ वयाचे लेखक सलीम खान अजूनही फिट आहे.ते म्हणतात की त्यांची खुराक कमी झालीय.माशाल्लाह पण ते दिवसाचे दोनदा दाबून खातात.

त्यांचा मेटाबॉलिज्म वेगळा आहे. डिसीप्लीन वेगळा आहे. रोज सकाळी बँडस्टँडपर्यंत चालत जातात आणि येतात.

आम्ही त्यांना असे तंदुरुस्त पाहून खूपच खूष होतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेणे महत्वाचे वाटते

मी पण योग्य आहार घेतो. एक चमचा भात खातो कधी १.५ चमचा खातो.भाजी किंवा चिकन वा मटण कोणताही एक पदार्थ खातो

मला वाटतं फिल्म इंडस्ट्रीत जिम कल्चर आणणारा मीच आहे. आधी लोकांना हे बेकार वाटायचं.आता सर्वच करत आहे.धर्मेंद्रजी जिम करत आहेत.