तुर्कीत किती भारतीय राहातात ?

27 June 2025

Created By: Atul Kamble

तुर्की देश सध्या चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावावेळी तुर्कीने पाकची बाजू घेतली होती.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोआन यांनी अलिकडेच भारताच्या विरोधात जात पाकची बाजू घेतली होती

यानंतर भारताने तुर्कीच्या विरोधात कारवाई केली. तुर्कीची एव्हीएशन कंपनी celebi airport services india ltd.चे कंत्राट भारताने रद्द केले

 ऑपरेशन सिंदूरच्या वेळी तुर्कीने उघडपणे पाकिस्तानची बाजू घेत त्या देशाला शस्रे पुरविली

एर्दोआन यांनी अलिकडे सांगितले की तुर्की पाकिस्तानच्या बाजूने खंबीरपणे उभा  आहे

मुस्लीम देश तुर्कीत २७ मार्च २०२७ ची परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार ३,३०६ भारतीय राहातात 

एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार साल २०२४ च्या आकडेवारीनुसार ३.३ लाख भारतीय तुर्कीला पर्यटनासाठी गेले होते. 

आता मात्र, पाकिस्तानचे समर्थन केल्यानंतर तुर्कीला जाणाऱ्या भारतीयांची संख्या घटली आहे.