'या' शहरात वडिलांपेक्षा अधिक आहे सुहाना खान हिची संपत्ती

Created By: Shweta Walanj

सुहाना खानने अलीबाग येथे जमीन घेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. 

रिपोर्टनुसार, सुहानाने रियल एस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. 

सुहाना हिने अलीबागच्या थाल गावात तब्बल 9.59 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. 

जमीन खरेदी करण्यासाठी अभिनेत्रीने 57 लाख रुपये स्टाम्प ड्यूटी भरली आहे. ज्याचं रजिस्ट्रेशन 13 फेब्रुवारी 2024 मध्ये झालं. 

पूर्वी देखील सुहानाने अलीबागमध्ये जमीन खरेदी केली. ज्याची किंमत 12.19 कोटी रुपये आहे. 

अलीबागमध्ये शाहरुख खान याची देखील प्रॉपर्टी आहे. जेथे अभिनेता कायम पार्टी करताना दिसतो.