श्वेता तिवारी सध्या 43 वर्षांची आहे. पण अजूनही नव्या अभिनेत्रींमध्ये श्वेता भाव खाऊन जाते.
16 December 2023
Created By: Chetan Patil
श्वेता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. श्वेताने वयाच्या 12 व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं होतं.
हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याआधी श्वेताने भोजपुरी इंडस्ट्रीत चांगलंच नावलौकीक कमवलंय.
श्वेता भोजपुरी इंडस्ट्रीतले प्रसिद्ध अभिनेते राजा चौधरी यांच्या प्रेमात आकांत बुडाली होती.
तिने वयाच्या 18 व्या वर्षी राजासोबत लग्न केलं होतं. पण लग्नानंतर 9 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला होता.
दोघांना पलक नावाची मुलगी आहे. पती विभक्त झाल्यानंतर श्वेताने आपल्या मुलीचं संगोपन केलं.
या दरम्यान 2012 मध्ये श्वेता तिवारीच्या आयुष्यात अभिनव कोहलीची एंट्री झाली. त्यांनी 2013 मध्ये लग्न केलं.
लग्नानंतर श्वेताने मुलाला जन्म दिला. पण 2019 मध्ये श्वेता दुसऱ्या पतीपासून अलिप्त झाली.
हेही वाचा : लग्नानंतरही अभिनेत्री 'त्या' निर्णयावर ठाम