Created By: Atul Kamble

04 May 2026

केवळ अभिनयातूनच नव्हे तर बिझनसमधून कमाई करतात हे स्टार

 शाहरुख खान रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊसचा मालक असून आयपीएल टीमचा देखील मालक आहे.

प्रियंका चोपडा एनोमली हेअर केअरची को-फाऊंडर आहे. तसेच होम डेकोर ब्रँड सोना होमची मालकीनही आहे.

अनुष्का शर्मा नश नावाच्या कपड्यांच्या ब्रँडची मालकीण आहे. ती स्पर्ल फार्मची ब्रँड एम्बेसेडर आहे. ती तिचा भाऊ कर्णेश शर्मा याच्या क्लीन स्लेट फिल्म प्रोडक्शन हाऊसची सहसंस्थापक होती. मात्र, नंतर तिने हे पद सोडले.

रणवीर सिंह प्रोटीन सप्लीमेंट ब्रँड सुपरयू याचा फाऊंडर आहे. बंगलुर येथील लैंगिक आरोग्य आणि कल्याण ब्रँड बोल्ड केअरचा देखील सह मालक आहे.

दीपिका पादूकोण स्किनकेअर ब्रँड 82 डीग्री E ची मालकीण आहे.लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन नावाची मेंटल हेल्थ एनजीओ चालवते. ती के.ए.प्रोडक्शंस हाऊसचा भाग आहे.

कृती सनोन स्कीनकेअर ब्रँड हायफनची मालकीण आहे. फिटनेस स्टार्टअप, द ट्राईबची सहसंस्थापक आहे. ब्ल्यू बटरफ्लाय फिल्म्सचा देखील भाग आहे.

 मलायका अरोरा वेलनेस स्टार्टअप सर्व योगाची सह मालकीण आहे. तिचे रेस्टॉरंट देखील असून त्यातून तिला कोट्यवधीची कमाई होते.

हृतिक रोशन एक एक्टिवविअर आणि फिटनेस लाईफस्टाईल ब्रँड HRX चा मालक आहे.