कोण आहे ती अभिनेत्री? 13 चित्रपटातून काढलं, मग तिने दिला 100 कोटीची  हिट चित्रपट. 

अनेकदा अभिनेत्री चित्रपट नाकारतात. त्यावेळी त्यांच्याकडे दुसरा चित्रपट असतो किंवा त्यांना रोल आवडलेला नसतो.

अनेक स्टार्सना स्ट्रगलच्या दिवसात चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवतात. विद्या बालन त्यापैकीच एक आहे.

एक-दोन नाही, तब्बल 13 चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं, असं विद्या बालनने एका मुलाखतीत सांगितलं.

एका निर्मात्याने खराब दिसते, या कारणावरुन विद्या बालनला बाहेर काढलं होतं. विद्या आरशात स्वत:ला  पहायला घाबरायची.

मलयालम चित्रपट बंद झाल्यानंतर निर्मात्याने तिला वाईट म्हटलेलं. बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागलेला.

'कहानी', 'नो वन किल्ड जेसिका' हे विद्याचे हिट चित्रपट. तिच्या 'द डर्टी पिक्चर' चित्रपटाने 100 कोटीपेक्षा  जास्त कमाई केली.