29 october 2025
Created By: Atul Kamble
शाहरुखची पत्नी गौरी खान प्रख्यात इंटेरिअर डिझायनर आहे. ती चित्रपट निर्माती देखील आहे आणि ती रेस्ट्रॉरंटची मालकीणही आहे.
गौरी खान हीचे मुंबईत टोरी नावाने पॅन एशिया रेस्ट्रॉरंट उघडले आहे.याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. याच्या सुंदर इंटेरिअरपासून मेन्यूपर्यंत सर्वांची चर्चा सुरु आहे.
चला तर पाहूयात टोरी मध्ये काय मिळते आणि त्याची किंमत काय ? लक्झरी डायनिंगसाठी टोरी एकदम योग्य जागा आहे. येथे एकाहून एक पदार्थ उपलब्ध आहेत.
येथे समर व्हेजिटेबल सुई,ट्रफल एडमामे सारखे पदार्थ 950 रुपयात मिळतात. टोरी व्हेज ग्योजा म्हणजे ट्रॅडिशनल जपानी मोमोचे 8 पीस 1500 रुपयांना मिळतात.
सलाडमध्ये आईस बर्ग पासून सशिमि सलाडची किंमत 500 ते 1100 रुपये आहे.यात सालमन ,टुना आणि हमाची मासे असतात.
स्नॅक्समध्ये तुम्ही 750 रुपयात लोटस रुट विद सिंगापूर चिलीची मजा घेऊ शकता. तर 600 रुपयांत इनोकी मशरुम टेम्पुरा खाऊ शकता
800 रुपयात तुम्ही चिकन यकीटोरी खाऊ शकता.याशिवाय एनजी लॅब चोप आणि मिसो ब्लॅक कोड-3800 आणि 4500 रुपयात मिळेल.
गौरी खान हीचे रेस्टॉरंट टोरी फेक पनीर वादामुळेही चर्चेत आले होते. नंतर हा दावा फेटाळला गेला.