शाहरुखशी लग्न आणि  धर्म परिवर्तनाबद्दल  बोलली गौरी खान. 

शाहरुखने बॉलिवूडमध्ये एंट्री केली नव्हती, तेव्हापासून दोघे एकत्र आहेत. 1984 साली शाहरुख दिल्लीत गौरीला पहिल्यांदा भेटला.

शाहरुख मुस्लिम आणि गौरी हिंदू, मात्र तरीही दोघे प्रेमात पडले. 25 ऑक्टोबर 1991 रोजी दोघांनी लग्न केलं. शाहरुखने दोन्ही पद्धतीने लग्न केलं.

शाहरुख-गौरीच्या लग्नाला 33 वर्ष झालीयत. मात्र, अजूनही त्यांचं नात नवीनच वाटतं. दोघे नेहमी एकमेकांना सपोर्ट करतात. 

'कॉफी विद करण'मध्ये गौरी सुजैन खानसोबत आली होती. त्यावेळी शाहरुख आणि आपल्या धर्माबद्दल ती मोकळेपणाने बोललेली.

आर्यन शाहरुखच्या खूप जवळ आहे. मला वाटतं तो त्याचा धर्म फॉलो करतो. आर्यन नेहमी म्हणतो मी मुस्लिम आहे असं गौरी म्हणालेली.

मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते. याचा अर्थ मी धर्म परिवर्तन कराव असा होत नाही, असं गौरी या शो मध्ये म्हणालेली.

प्रत्येकाने आपल्या धर्माच पालन केलं पाहिजे. पण यामध्ये कोणाचा अपमान होऊ नये. शाहरुख माझ्या धर्माच अपमान करणार नाही असं गौरी म्हणालेली.