शाहीद कपूर बरोबरच्या आपल्या प्रेमाबद्दल जेव्हा करिना कपूर बोलली होती..
27 सप्टेंबर 2025
created by : atul kamble
शाहीद कपूर आणि करीना कपूर यांचं अफेअर साल २००४ ते २००७ च्या दरम्यान प्रचंड चर्चेत आलं होतं.दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
प्रेमाची मोकळेपणाने कबूली दिली
या नात्याची सुरुवात 'फिदा' ( २००४) चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. तर 'जब वी मेट' ( २००७) वेळी हे नातं संपलं होतं.
'जब वी मेट' दरम्यान सर्व संपलं
एकदा करीना कपूर हीने आपल्या या नात्याबद्दल 'कॉस्मोपॉलिटन'शी बोलताना सांगितलं होतं. आपल्या या थ्रोबॅक इंटरव्ह्यूत शाहीद कपूर सोबतच्या रिलेशनशिपवर सर्व सांगितलं होतं.
आपल्या नात्याबद्दल सांगितलं
ही गोष्ट त्यावेळची आहे. तिने म्हटले होते की आम्ही तेच करत होतो जे कोणतेही नॉर्मल यंग कपल करतो आहोत. बाहेर जेवण करणे, चित्रपट पाहणे..मला चित्रपट पाहणे खूप आवडते.
जेव्हा करीना शाहीदच्या टचमध्ये होती
करीना यावेळी म्हणाली की, जेव्हा आम्हाला संधी मिळायची तेव्हा आम्ही फेम एड लॅब्समध्ये चित्रपट पाहाण्यास जायचो.
जेव्हा आम्हाला संधी मिळायची
करीना म्हणाली की चित्रपट सुरु झाल्यानंतर अंधार व्हायचा तेव्हा आम्ही गुपचूप आत जायचो
आम्ही गुपचूप आत पोहचायचो
करीना हीने शाहीद सोबत आऊटिंगबद्दल सांगितले. ती म्हणाली की हे खूप मजेदार आहे आणि खूपच रिलॅक्सिंग आहे.
शाहीद सोबत आऊटिंग
करीना हीने सांगितले होते की शाहीदच्या सोबत राहण्यास मला सर्वात जास्त मजा येत होते. मी तेव्हा नॉर्मल होऊन जाते आणि नॉर्मल गोष्टी करते.
सर्वात जास्त मजा येते
'जब वी मेट'च्या अंशुमन म्हणजे तरुण राज अरोरा याने म्हटले की या फिल्मच्या सेटवर या प्रकरणाने माहोलमध्ये बैचेनी होती. परंतू दोन्ही एक्टर सिरियस एक्टर असल्याने त्यांनी पर्सनल समीकरणाचा कामावर परिणाम होऊ दिला नाही.