घर बांधताना  ‘या’ गोष्टी  लक्षात घ्या

तुमच्या जमिनीत बांधकाम करण्यापूर्वी खोदताना जर हाडे, क्रॅनियम, कोळसा आढळल्यास ती जमीन शुभ मानली जात नाही.

या ऐवजी जर तुम्हाला त्या ठिकाणी नाणी, वीट, दगड इत्यादी वस्तू मिळाल्या, तर ही जमीन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुखकारक आणि समृद्ध करेल.

मातीचा रंग लाल असेल तर व्यवसायासाठी खूप चांगला पण जर मातीचा रंग काळा असेल तर त्या जमिनीवर घर बांधणे अतिशय शुभ आहे.

तसेच, भूखंड खरेदी करताना हे तपासून घ्या की, जमिनीभोवती कोणतीही जुनी विहीर आणि भग्नावशेष नसावेत.

एखाद्या जमिनीवर घर बांधताना मुख्य गेटच्या दिशेने लक्ष देणे आवश्यक आहे. 

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर किंवा पूर्वेकडे प्रवेशद्वार असणे शुभ मानले जाते. परंतु प्रवेशद्वार दक्षिण दिशाला नसावे. 

जर जमिनीवर झाडे असतील, तर त्या जागेवर घर बांधू नये. घराच्या दक्षिण दिशेला गटार, हातपंप, पाण्याची टाकी असता कामा नये.

घराच्या मुख्य दरवाज्यावर सावली पडायला नको. त्यामुळे दरवाजाच्या अगदी समोर एखादे झाड किंवा खांब असणार नाही, याची काळजी घ्या. 

तसेच दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या असल्यास त्यांची संख्या विषम असावी. दरवाजा 10 फूट उंच असेल तर त्याची रुंदी 5 फूट असावी.

ईशान्य भागाकडील या प्रभागात देवघर असावे. या भागात अभ्यास, पोथीवाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ध्यानधारणा अवश्य करावी. 

घरातील आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणे सर्वाधिक शुभ मानले जाते. तसेच शारीरिक व्यायामासाठीही हा भाग चांगला असतो.

आग्नेय दिशेला लहान मुलांची झोपण्याची व्यवस्था करणे हे त्यांच्या शरीरसंपदा आणि बौद्धिक संपदा वाढविण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरते.