या 9 सवयी आताच बदला अन्यथा व्हाल कंगाल, पैसा असा वाचवा

 10 June 2025

Created By: Atul Kamble

लोक मेहनतीने पैसा कमावतात. परंतू वाईट सवयींमुळे बचत होत नाही.

एखादी वस्तू आवडली की लगेच खरेदी करण्याची सवय सर्वात वाईट आहे.ती बदला

दर महिन्याचा जमाखर्च मांडा त्यामुळे पैसा नक्की कशावर खर्च होतोय याचा अंदाज येतो

काही जण निवृत्तीनंतरची प्लानिंग करीत नाहीत,दर महिन्यास काही पैसे वेगळे काढून ठेवा

क्रेडिट कार्डचे बिल लागलीच भरा, अन्यथा चक्रवाढ व्याजाने गुदमरुन जाल

 तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असायलाच हवा, अन्यथा नोकरी गेल्यास वा आजारपणात अडचणी याल.दर महिना बचत करा

बाहेर जेवणे, लक्झरी लाईफने सेव्हींग होत नाही, खरी गरज आणि इच्छा वेगळ्या असतात.नॉन एसेंशियल खर्चास कमी बजेट ठेवा

 पैशाची समज नसणे ही वाईट सवय आहे. फायनान्स संदर्भात अपडेट राहा,गुंतवणूकची सल्ले घ्या