खानदानी जुन्या दागिन्यांवर असे करा हॉलमार्किंग, अन्यथा होईल मोठे नुकसान

16 september 2025 

Created By: Atul Kamble

 वारसा म्हणून मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांशी भावना जोडलेल्या असतात.परंतू बाजारात त्यांचे मुल्य शूद्धतेवर ठरते.यांना विकायचे असेल तर हॉलमार्क शिवाय योग्य किंमत मिळत नाही

 हॉलमार्क ही सरकारी गॅरंटी असते.तुमच्या दागिन्यात तेवढेच सोने आहे, जेवढे लिहिलेले असते.यातून तुम्ही ज्वेलर्सच्या चालबाजीतून वाचू शकता

 जर दागिन्यांवर BIS चा त्रिकोणी लोगो असेल तर समजा ते असली आहेत.ही छोटी मोहर तुमचे लाखोंचे नुकसान वाचवू शकते

 BIS सेंटरवर लावलेली मशीन्स तीन स्तरावर सोन्याची तपासणी करतात.आणि कॅरेटमध्ये त्याची शुद्धता सांगतात.हा सोन्याची शुद्धता तपासण्याचा सर्वात खात्रीशीर उपाय आहे.

जर दागिन्यांवर हॉलमार्क नसेल तर ज्वेलर्स तुम्हाला कमी कॅरेट सांगून भाव कमी करु शकतो.त्यामुळे तुम्हाला सोन्याची योग्य किंमत मिळणार नाही

जुने दागिने विकण्याचा ट्रेंड असतो.परंतू असे करण्याआधी हॉलमार्क करावे.म्हणजे नवीन सोने खरेदी करताना जुन्या सोन्याला चांगला भाव मिळेल

तुम्ही BISच्या बेवसाईटवर जवळचे हॉलमार्कचे सेंटर शोधू शकता.या सेंटरवर काही मिनिटांत तुमच्या सोन्याची तपासणी होऊन ते प्रमाणीत केले जातील