चिया सीड्स VS जिरे पाणी : केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कोण चांगले ?

15 september 2025

Created By: Atul Kamble

जिरे आणि चिया सीड्स दोन्ही आरोग्य आणि सौदर्यासाठी चांगले आहेत.भारतीय घरात जिरे मसाला आणि औषधी गुणधर्मासाठी वापरले जाते.

 चिया सीड्स फिटनेसची काळजी घेणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आजकाल केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही चिया सीड्सचा वापर केला जातोय

ग्लोईंग त्वचा आणि सुंदर केसांसाठी चिया बेस्ट आहे की जिरे पाहूयात

जिरे पाण्यात एंटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असते.जे तुमच्या स्कीनला फ्रेश आणि केसांना चमकदार बनवते.यात विटामिन आणि मिनरल्स असतात जे त्वचा आणि केसांना निरोगी बनवतात

जिरे पाणी शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करते.ज्याने स्कीन हेल्दी आणि केस दाट व मजबूत होतात. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सेलेनियम सारखे मिनरल असतात.जे त्वचेला तरुण बनवतात

चिया सीड्सचे पाण्यात ओमेगा-३ फॅटी एसिड भरपूर असते.जे स्कीनची सूज कमी करते.युव्ही रेडिएशनपासून बचाव करते.यात विटामिन A,C,पॉटेशियम आणि आयर्न असतात ते स्कीन चमकदार बनवतात

एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा जिरे टाका, व रात्रभर भिजत ठेवा.सकाळी हे पाणी गाळून नंतर उकळावे. नंतर गॅस कमी करुन यात १ चमचा लिंबू रस आणि मोठा चमचा मध टाकावा

१ कप पाण्यात २ मोठे चमचे चिया सीड्स टाकून रात्रभर भिजवत ठेवा.सकाळी हे पाणी नीट हलवून प्यावे.

दोन्ही ड्रींक स्कीनसाठी चांगले आहेत. चिया सीड्स स्कीनसाठी जास्त लाभदायक आहे.याची हायड्रेटिंग प्रॉपर्टीज, ओमेगा-३ फॅटी एसिड आणि फायबर स्कीन आतून मॉईश्चराईज आणि हेल्थी ठेवते. जिरा पाणी गट हेल्थ आणि डायजेशनसाठी चांगले.