हे 3 पदार्थ लिव्हरला करतात डॅमेज, हार्वर्डच्या डॉक्टरने दिली माहिती

15 september 2025

Created By: Atul Kamble

 लिव्हर शरीराचा महत्वाचा अवयव आहे. डायजेशन, टॉक्सिंस पदार्थ रिलीज करणे,मेटाबॉलिझम, इम्युनिटी वाढवणे आणि विटामिन्स स्टोरेजसाठी मदत करतो.

आपण जे रोज खातो त्यातील अनेक पदार्थ लिव्हरसाठी चांगले असतात तर काही एकदम वाईट असतात

हार्वर्डचे लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर सौरभ सेठी नेहमीच इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन लोकांना आरोग्याचे सल्ले देतात

लिव्हर स्पेशालिस्ट म्हणून हे 3 पदार्थ टाळावेत असा सल्ला लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर सौरभ सेठी देतात

बाजारात डब्बे बंद ज्यूस साखरेने पूरेपूर असतात, यात फायबर नसते ना पोषक कुठले पोषक तत्व

पॅकबंद ज्युस ब्लड शुगर स्पाईकला वाढवतात.त्यामुळे लिव्हरला अधिक काम करावे लागते.त्यामुळे फॅटी लिव्हरचा रिस्क वाढते

जेवणात सोयाबिन, कॉर्न आणि सुर्यफुलाचे तेल वापरले जाते. बाजारात स्नॅक्समध्ये रिफाईंड ऑईल खूप असते

या तेलातील ओमेगा 6 सूज आमि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतो,त्याने फॅटी लिव्हर होतो आणि लिव्हरला मोठे नुकसान होते

सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड आणि एनर्जी ड्रिंक्समध्येही साखर खूप जास्त असते.त्यामुळे लिव्हरची फॅट वाढून फॅटी लिव्हर होऊ शकतो