या 5 भाज्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात, हार्टही निरोगी रहाते

14 september 2025

Created By: Atul Kamble

बॅड कोलेस्ट्रॉलने हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका असतो. औषधानी हे कोलेस्ट्रॉल कमी करता येते. परंतू योग्य आहारही मदतीला येतो

बॅड कोलेस्ट्रॉलला काही भाज्या आहारात समाविष्ट केल्यास रोखता येते

 ब्रोकली या भाजीत फायबर, एंटीऑक्सिडेंट्स आणि विटामिन्स भरपूर असतात.

भेंडीत सॉल्युबल फायबर जादा असते. यातील जेल सारखा पदार्थ कोलेस्ट्रॉलला रक्तात जाण्यापासून रोखते.या मुळे (एलडीएल) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते (एचडीएल) चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

वांगी देखील कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यात मदत करते. यात कॅलरी कमी आणि पोषक तत्वे अधिक असतात. ते हृदयासाठी फायदेमंद असतात.

 गाजर हृदय आणि डोळ्यांसाठी चांगले असते. बॅड कोलेस्ट्रॉल रक्तात जाण्यापासून वाचवते.यात बीटा कॅरोटीन सारखे एंटीऑक्सिडेंट्स असतात. ते इंफ्लेमेशन कमी करुन रक्तवाहिन्यांची सुरक्षा करतात.

 पालकमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. फायबर असते ते कोलेस्ट्रॉलला रोखते.मॅग्नेशियम आणि पॉटेशियम ब्लड प्रेशरला कंट्रोल करते

जर तुम्हाला हृदयाची काळजी घ्यायची असेल तर कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण असले पाहिजे.ब्रोकली, भेंडी, वांगी,गाजर आणि पालक आपल्या आहारात समाविष्ट करा.