01 ऑक्टोबर 2025
created by : atul kamble
Adobe ने भारतीय वंशाच्या अनिल चक्रवर्ती यांना आपला पुढचा अध्यक्ष आणि सीईओ नियुक्त केले आहे. ते १ डिसेंबरपासून ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
सत्या नडेला - हैदराबाद येथे जन्मलेले सत्या नडेला २०१४ पासून Microsoft चे CEO आहेत आणि कंपनीला Cloud आणि AI च्या क्षेत्रात पुढे नेत आहेत.
सुंदर पिचाई - मदुरईचे सुंदर पिचाई Google आणि तिची पॅरंट कंपनी Alphabet चे CEO आहेत.
नील मोहन - भारतीय वंशाचे नील मोहन 2023 पासून YouTube चे CEO आहेत आणि प्लेफॉर्मची ग्लोबल रणनिती सांभाळत आहेत.
अरविंद कृष्ण - IIT कानपूरचे माजी विद्यार्थी अरविंद कृष्ण 2020 पासून IBM चे CEO आहेत. कंपनीचा Cloud आणि AI बिझनेस सांभाळत आहेत.
लीना नायर- कोल्हापूरच्या लीना नायर साल 2022 पासून फ्रेंच लक्झरी कंपनी Chanel च्या ग्लोबल सीईओ आहेत.
राज सुब्रमण्यम - केरळच्या तिरवनंपुरमचे राज सुब्रमण्यम 2022 पासून FedEx चे अध्यक्ष आणि सीईओ आहेत.
कुणाल शाह WhatsApp चे Global Head आहेत. जगातील सर्वात मोठ्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्मची प्रोडक्ट धोरण सांभाळतात.
निकेश अरोरा - निकेश Palo Alto Networks चे चेअरमन आणि CEO आहेत. आणि ग्लोबल सायबर सिक्यिुरिटी सांभाळत आहेत.