पाकिस्तानच्या या नदीत सहाशे अब्जाचे सोनं? काय आहे सत्य ?

23 February 2025

Created By: Atul Kamble

हिमाचलमधून पाकिस्तानात पोहचणाऱ्या सिंधुनदीत ( indus River ) नदीत सोनं असल्याचे म्हटलं जातंय

नेहमी म्हटलं जातं कि पाकिस्तानात वाहणारी सिंधू नदीत पाण्याखाली अब्जावधी सोनं दडलं आहे

सिंधूनदीच्या किनारी प्राचीन संस्कृती उदयास येऊन तिचा विकास झाला होता

 इतिहासात सिंधु संस्कृती ३३०० ते १३०० ईसवी सन पूर्व दरम्यान विकसित झालेल्या एका संस्कृतीचा भाग होती

जर या नदीच्या खाली एवढे सोने असेल तर पाकिस्तान जगातील सर्वात श्रीमंत देश का होत नाही?

त्यामुळे सिंधुनदीच्या खाली खरेच सोने आहे का ? सोन्यात बातमीत तथ्य काय ?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अटक जवळ सिंधुनदीत सोन्याच्या खाणीचे संकेत मिळाले आहेत

 सिंधुनदीच्या पोटातील सोन्याचा अंदाज या सोन्याची किंमत ६०० अब्ज पाकिस्तानी रुपये  असून या क्षेत्राचा आर्थिक विकास होणार आहे.

 पर्वतात सोन्याचे अंश आधीपासून असतात. हवामानात बदलाने पर्वत तुटल्याने कण तुटून नदीच्या गाळात अडकतात

  नदीतून हे सोन्याचे कण वाहतात आणि जड कण खाली तळाशी बसतात, यास प्रक्रीयेस सेडिमेंटेशन म्हटले जाते

नदीची माती आणि वाळू फिल्टरेशनचे काम करते. ज्याने गोल्ड पार्टीकल्स नदीच्या विविध किनाऱ्यावर पोहचतात

 हे कण सिंधु नदीच्या वेगवान प्रवाहाने वाहून नदीच्या तळाशी जातो. या प्रक्रीयेस 'प्लेसर गोल्ड डिपॉझिट्स'म्हणतात.सोन्याचा मोठा साठा त्यामुळे होतो

पाकिस्तान या अटक जिल्ह्यात खासकरुन ३२ किलोमीटरच्या सोन्याचा खजाना पसरल्याचा अंदाज आहे

 येथे सुमारे ३२.६ मेट्रीक टन सोने मिळण्याची शक्यता असून त्याची किंमत ६०० अब्ज पाकिस्तानी रुपये असू शकते