घरात किती रोकड ठेवण्यास नियमानुसार परवानगी ?

05 August 2025

Created By: Atul Kamble

भारतातील नागरिकास कायद्यानुसार किती रोकड घरी ठेवता येते,पण काही स्थितीत हिशेब द्यावा लागतो

जर तुमच्याकडे कॅश असेल तर त्याचे स्रोत द्यावे लागतात. जसा पगार,व्यापार,संपत्ती विक्री आदी. स्रोत नसेल तर कर विभाग कारवाई करतो

 जर तुम्ही मोठी रक्कम बाळगता तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणे गरजेचे,उत्पन्नानुसार डिस्क्लोज करणे नियम पालनाचा संकेत आहे. यामुळे चौकशी टाळता येते

जर कॅशचा स्रोत सांगितला नाही तर आयकर विभाग अनएक्सप्लेन इन्कम मानतो. कलम ६९ अ नुसार ६० टक्के टॅक्ससह सरचार्ज आणि सेस लावू शकतो

जर तुम्ही २ लाखाहून अधिक रक्कम कोणाता देता किंवा घेता तर हे आयकर नियमाच्या कलम २६९ ST चे उल्लंघन आहे. यावर तेवढीच रक्कम दंड होऊ शकतो

 लग्न, भेट, मोठी खरेदीवर देखील २ लाखाहून अधिक कॅश देणे घेणे बेकायदेशीर आहे.यात नियमभंगामुळे आयकर विभाग मोठा दंड ठोठावू शकते

जर तुमच्याकडे खूप कॅश आहे. तर त्याची पावती, अकाऊंट स्टेटमेंट, विक्री किंवा सॅलरी प्रमाणपत्र सुरक्षित ठेवावे.चौकशीच्या वेळी बचावासाठी कामी येईल

डिजिटल ट्राक्झंशनवर सरकारने भर दिला आहे. म्हणजे पारदर्शकता राहील. जादा ट्राक्झशन संशय येऊ शकतो. म्हणून कॅशचा मर्यादित वापर करावा