5 हजाराची जीन्स  आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल

17 सप्टेंबर 2026

देशात युपीआय पेमेंटवर नवीन मर्चंट डिस्काऊंट रेट ( MDR ) लागू होणार आहे.

एनडीए सरकारने हा युपीआय टॅक्स १५ ऑक्टोबर पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन धोरण अमलात येताच 2000 हून अधिक रुपयांच्या युपीआय पेमेंटवर 0.40 टक्के MDR लागेल.

सरकारी सर्क्युलर नुसार सर्व पेमेंट्सवर एक समान युपीआय चार्ज नसून त्याची वर्गवारी केली आहे.

 युपीआय MDR लिमिट सेट झाल्यानंतर तुम्ही दुकानातून 5000 हजाराची जिन्स खरेदी केली तर किती चार्ज लागेल ?

युपीआयने पमेंट केल्यानंतर 2000 रुपयांहून जास्त खरेदीवर 0.40 टक्के म्हणजे पाच हजारच्या जीन्सवर 20 रुपये कर लागेल.

जर तुम्ही 10 हजाराचे बुट खरेदी करायला गेला तर या हिशेबाने 40 रुपयांचा युपीआय कर लागू होईल.

मात्र, हा एमडीआर ग्राहकांवर लागू होणार नाही. तर त्या दुकानदारांवर लागू होणार आहे.

सरकारी परिपत्रकानुसार जे दुकानदार मासिक एक लाख रुपयांपर्यंतच युपीआय पेमेंट स्वीकारत असतील तर त्यांना झिरो एमडीआर लागेल.

 तसेच तुम्ही ज्या दुकानातून बुट-जीन्स खरेदी करताहेत आणि ग्राहकांकडून मिळालेले युपीआय पेमेंट या मर्यादेच्या पेक्षा जास्त असेल तर त्याला MDR द्याला लागेल.