आधार नंबर आठवत नाहीय? एका कॉलवर मिळेल माहिती, जाणून घ्या
6 October 2025
Created By: संजय पाटील
आधार कार्ड नंबर आठवत नसेल तर एका कॉलद्वारे जाणून घेता येईल.
बहुतांश ठिकाणी आधारशिवाय काम होत नाही. त्यामुळे ऐनवेळेस आधार कार्ड नंबर न आठवल्यास गैरसोय होते.
यूआयडीएआयच्या 1947 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. हा टोल फ्री क्रमांक पूर्णपणे सुरक्षित आहे.
कॉल केल्यानंतर जन्मतारीख, मोबाईल नंबर संबंधित माहिती विचारली जाईल. त्यानंतर तुम्हाला आधार इनरॉलमेंट आयडी sms केला जाईल.
आधार कार्ड नंबर जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबरसह लिंक असायला हवा, कारण त्याच मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवला जाईल.
आधारच्या वेबसाईटवर retirve lost or forgotted eid/uid पर्याय निवडा. ओटीपी आल्यानंतर sms आणि मेलद्वारे आधार नंबर मिळेल.
एमआधार एपद्वारेही तुम्ही तुमचा आधार क्रमांक जाणून घेऊ शकता. एपमध्ये लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती मिळेल.
मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळील आधार केंद्रावर जा. तिथे कर्मचारी इतर कागदपत्रांच्या मदतीने तुमचा आधार नंबर सांगू शकतील.
श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा