EPF Online Withdrawal : पीएफचे पैसे ऑनलाइन कसे काढायचे?

19 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

तुम्ही घर बांधण्यासाठी, लग्नासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी पीएफ काढण्याचा विचार करत आहात. तर असं काढू शकता. 

ईपीएफओ ही एक सरकारी योजना आहे. यात कर्मचारी आणि मालक दोघेही दरमहा योगदान देतात. तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर सर्वप्रथम अर्ज करावा लागेल.

निवृत्तीवेळी तुम्हाला ईपीएफओमधले पैसे व्याजासह मिळतात. पण गरजेवेळी तु्म्ही पैसे काढू शकता. ऑनलाइन कसे काढायचे ते जाणून घ्या.

सर्वप्रथम युएएन सक्रिय करणं आवश्यक आहे. पाच वर्षाआधी 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढणार असाल तर आधार आणि पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक हवं. म्हणजेच सर्वात आधी केवायसी पडताळली पाहीजे. 

ईपीएफओच्या पोर्टलवर जाऊन युएएन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. कॅप्चा भरा आणि साइन इन करा. यानंतर मॅनेज केवायसीवर जा आणि आधार, पॅन आणि बँक डिटेल चेक करा. 

ऑनलाइन सेवा टॅबवर क्लिक करा आणि क्लेमवर (फॉर्म 31,19,10सी आणि 10 डी)क्लिक करा. बँक डिटेल भरून व्हेरिफाय करा. परत डिटेल टाका आणि पूर्ण क्लेमसाठी फॉर्म 19, फॉर्म 10सी पेन्शन आणि फॉर्म 31 एडवांस काढण्यासाठी असेल. 

सर्व माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करा. तुम्हाला Acknowledgement मिळेल. भविष्यासाठी सेव्ह करा. पाच ते 20 दिवसांच्या आत पैसे जमा होतील. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या