क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे

6 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंटचा वापर प्रत्येक जण करतो. यामुळे व्यवहार करणं सहज सोपं होतं.

तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही क्रेडिट कार्डही युपीआयशी लिंक करू शकता. यामुळे काही फायदे मिळतात. फिजिकल क्रेडिट कार्ड नेण्याची गरज भारत नाही.

काही दुकानांमध्ये पीओएस मशिन नसते. पण क्युआर कोड असतो. अशा ठिकाणी क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक असेल तर फायदा होतो. यामुळे पॉइंट्स आणि कॅशबॅक मिळतो.

क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक असल्यास पैसे नसले तरी पेमेंट करू शकता. चला जाणून घेऊयात लिंक कसं करायचं ते

तुमचं क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक करण्यासाठी तुम्हाला प्रथम युपीआय अॅपवर जावं लागेल. नंतर Add Payment Method वर क्लिक करावं लागेल. 

क्रेडिट कार्ड पर्याय निवडताच आणि तुमच्या क्रेडिट कार्ड भरा. जसं की सीव्हीव्ही, क्रेडिट कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट..

तुम्हाला पडताळणीसाठी ओटीपी नंबर येईल. तो टाका. मग क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक होईल. त्यानंतर तुम्ही आरामात पेमेंट करू शकता.

साप की मुंगूस! पळण्यात कोण सर्वात आघाडीवर? कोण जिंकणार?