देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने लाखो शेअर विकले आहे.

17 June 2025

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, RIL ने एशियन पेंट्सचे 85 लाख शेअर विकले आहे. त्यातून 1,876 कोटी रुपये मिळवले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली सहयोगी कंपनी सिद्धांत कमर्शियल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शेअर विकले आहे. 

मुकेश अंबानी यांच्या कंपनीने एशियन पेंट्सचे लाखो शेअर ICICI प्रूडेंशियल लाइफ म्यूचुअल फंडला 2,207 रुपये या दराने विकले आहे. 

मार्च 2025 पर्यंत Asian Paints मध्ये रिलायन्सचा वाटा 0.9% राहिला आहे. रिलायन्सकडे अजून एशियन पेंट्सचे 200,000 शेअर आहेत.

एशियन पेंट्सचे शेअर विकल्यानंतर रिलायन्सचा शेअरमध्ये 0.63 टक्के वाढ झाली. हा शेअर 1436.90 रुपयांवर बंद झाला.

RIL चा शेअरमध्ये या वर्षात 18% वाढ झाली. मागील सहा महिन्यातच ही वाढ 17% आहे.