किडनी शरीरातील फिल्टर सिस्टम आहे. हे रक्त स्वच्छ करुन टॉक्सिक पदार्थ यूरिनच्या बाहेर काढते.
12 June 2025
किडनीकडून पाणी आणि मिनरल्स यांचा समतोल राखण्याचे काम केले जाते. किडनी योग्य प्रकारे काम करत नसेल तर शरीरात टॉक्सिक पदार्थ जमा होतात.
टॉक्सिक पदार्थ जमा झाल्यामुळे उच्च रक्तदाब, अशक्तपणा, सूज येणे यासारख्या गंभीर आजाराचा धोका असतो.
किडनीचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी तुम्हाला काही वस्तूंचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे.
डॉ. दीपक सुमन म्हणतात, सफरचंदात फायबर मुबलक असतात. त्यामुळे शरीराचे पाचन तंत्र मजबूत होते. शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढले जातात.
पालक, मेथी यासारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असतात. यामुळे यूरेनरी ट्रॅक्ट क्लीन होते. किडनीवर जास्त लोड येत नाही.
गाजरमध्ये बीटा कॅरोटीन होते. ते व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. संक्रमणापासून किडनीचा बचाव करते. गाजरचे ज्युस शरीर डिटॉक्स करते.
लसूणात एंटीबॅक्टीरियल आणि एंटीइंफ्लेमेटरी गुण आहेत. त्यामुळे रक्तदाब कमी होतो. किडनीच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम