डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी घरातच क्रीम तयार करता येते.
27 May 2025
घरात संध्याकाळ होताच डास येणे सुरु होते. दरवाजे, खिडक्या बंद केल्यावरही डास येत असतात.
घरात डास मारण्यासाठी क्रीम बनवण्यासाठी ½ चमचा पेपरमिंट ऑईल, ½ चमचा कडू निंबाचे तेल, ½ चमचा व्हिगेनर, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा एलोव्हिरा जेल, 1 चमचा शिया बटर घ्या.
एका वाटीत पेपरमिंट ऑईल, कडू निंबाचे तेल आणि व्हिगेनर टाका. त्यानंतर त्याच्यात एलोव्हेरा आणि शिया बटर टाकून मिक्स करा. त्यानंतर बेकिंग सोडा टाकल्यावर क्रीम तयार झाली.
नारळाचे तेल डासांना लांब ठेवते. त्यात एंटी-बॅक्टीरियल गुण आहेत. त्यामुळे त्वचा सुरक्षित राहते.
कडू निंबाचे तेलही डासांपासून वाचण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. त्याचा सुंगध डासांना आवडत नाही.
लैवेंडर तेलाचा सुंगध डासांना आवडत नाही. क्रीममध्ये चार-पाच थेंब हे तेल टाकू शकता.