20 नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

ना लाखोंचा पगार, ना लॉटरी… श्रीमंत होण्यासाठी आजपासूनच  लावा 'या' 6 सवयी

श्रीमंत होण्यासाठीच्या सवयी आपल्याला अनेकदा असे वाटते कि लाखो  रूपये मिळाले म्हणजे आपल्या सगळ्या अडचणी सुटल्या, आपण आता श्रीमंत होऊ पण तसं काही होत नाही, हे कटू सत्य आहे. कसे श्रीमंत होता येईल  याबद्दल जाणून घ्या.

खर्च करण्याआधी बचत करायला शिका बहुतेक लोक पैसे हातात येण्याअगोदरचं भरपूर खर्च करून टाकतात. त्यामुळे हातात काहीचं उरत नाही. त्यामुळे महिन्याला हातात सॅलरी येताच थोडे पैसे खर्चाला ठेवा आणि बाकीचे बचत करा.

शेअर बाजारात  गुंतवणूक शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने पैसे वाढवतात.  पण यासाठी कोणताही शॉर्टकटचा वापर  करू नका. काळजीपूर्वक गुंतवणूक महत्त्वाची

जीवनशैलीतील महागाई टाळा केव्हा केव्हा गरज नसताना आपण अनेक वस्तू खरेदी करतो. वायफळ  असणाऱ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटू लागतात  त्यामुळे खर्च वाढतो. अशा वस्तू घ्यायच्या कमी केल्यास खर्च वाचू शकतो.

विम्यासारख्या स्किमचा वापर बरेच लोक बचत करतात पण ऐनवेळी ही बचत  गरजेस उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे आरोग्य विमा यांसारख्या आरोग्यविषयक स्किमचा वापर करा.

वर्षातून एकदा आर्थिक स्थितीचा आढावा खर्च करतो त्याचा हिशोब ठेवायलाच हवा.  त्यासोबतच दर 6 महिन्याने किंवा वर्षाने आर्थिक स्थितीचा आढावा घ्या.खर्च किती होतोय? कुठे जास्त खर्च होतोय याचा आढावा घ्या.

स्वत: च्या कौशल्यांवर गुंतवणूक करा नवीन कौशल्य शिकणे, ज्ञान वाढवणे आणि स्वत: ची कार्यक्षमता वाढवणे यावर खर्च करा. ही देखील  एक गुंतवणूक आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)