पोस्टाच्या योजनेत दररोज 333 रुपये वाचवा, आणि 17 लाख मिळवा, काय योजना?

Created By: Atul Kamble

4 january 2026

पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही पाच वर्षात लखपती होऊ शकता.यात दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करुन मोठा फंड जमा होतो

पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम ( RD)आहे. ही सुरक्षित सरकारी योजना आहे. ज्यात पैसे बुडण्याची शक्यता अजिबात नसते.

पोस्टात सध्या RD वर 6.7 टक्के वार्षिक व्याज आहे. हे व्याज दर महिन्याला चक्रवाढ पद्धतीने वाढते. ज्यामुळे तुमचा फायदा वेगाने वाढतो.

जर तुम्ही रोज 333 रुपये गुंतवले तर 5 वर्षांचे (60 महिने ) एकूण 6 लाख रुपये जमा होतात.यावर वर्षाला तुम्हाला 1.13 लाख रुपये व्याज मिळेल.

RD ला 5 वर्षांची मुदतवाढ दिल्यास 10 वर्षांची होईल. 10 वर्षात एकूण 12 लाख जमतील. हे व्याज वाढून सुमारे 5.08 लाख पोहचले. एकूण मिळून सुमारे 17.08 लाखाचा फंड आहे.

कोणताही भारतीय दर महिन्याला केवळ 100 रुपये भरुन खाते उघडू शकतो. जॉईंट अकाऊंट किंवा मुलाच्या नावाने खाते खोलू शकता. 1 वर्षांनंतर लोनची सुविधाही मिळते.

जे लोक बाजाराची रिस्कसाठी फिक्स  रिटर्न मिळवू इच्छीतात.त्यांच्यासाठी ही स्कीम उत्तम आहे. ही छोटी बचत मोठा सहारा बनू शकते.

नॉमिनी गरजेचे - जर कोणा कारणाने गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर RD ची संपूर्ण रक्कम आणि व्याज नॉमिनीला मिळते.