लिव्हर खराब होण्याचे सुरुवातीचे संकेत काय ?

Created By: Atul Kamble

4 january 2026

चुकीचा आहार, जास्त मद्यसेवन, तेलकट तुपकट खाणे, व्हायरल हेपेटायटिस,दीर्घकाळ औषधाचे सेवन आणि फिजिकल एक्टीव्हीटीची कमतरता याने लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते.

लिव्हर कमजोर झाल्याने शरीरातील टॉक्सिक तत्वं नीट बाहेर येत नाहीत.यामुळे मेहनत न घेता थकवा येतो, सुस्ती, दिवसभर कमजोरी येते.

लिव्हर खराब होण्याची सुरुवातीचा संकेत म्हणजे भूक लागणे कमी होते.थोडेसे खाल्ल्याने पोट भरते. खाण्याची इच्छा हळूहळू कमी होते.

लिव्हर काम करत नसल्याने पचन यंत्रणा बिघडते. सकाळी जेवल्यानंतर मळमळ, उलटी सारखे वाटणे, बैचेनी जाणवणे.

लिव्हर सुजल्यानंतर उजव्या बाजूला पोटात जडपणा, हलके दुखणे सुरु होते. अनेकांना ते गॅस झाला असे वाटते.

लिव्हर खराब झाल्याने बिलीरुबिन वाढते. त्यामळे त्वचा आणि डोळे हलके पिवळे दिसतात.

संतुलित आहार घ्या, मद्यापासून दूर रहा, रोज हलका व्यायाम करा,पर्याप्त पाणी प्या,वेळोवेळी लिव्हरची तपासणी करा.