शेअर बाजारात सध्या घसरण सुरु आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल येत आहेत.
19 July 2025
देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहापैकी एक असलेल्या टाटा ग्रुपच्या टाटा कम्युनिकेशनचे तिमाही निकाल आले आहेत.
देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहापैकी एक असलेल्या टाटा ग्रुपच्या टाटा कम्युनिकेशनचे तिमाही निकाल आले आहेत.
कंपनीने शेअर बाजाराला नफ्यात घसरण झाल्याचे कळवले आहे. कंपनीचा नफा 190 कोटी रुपयांवर आला आहे.
मागील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कंपनीचा नफा 332.93 कोटी रुपये होता. त्यात यंदाच्या तिमाहीत घसरण झाली आहे.
कंपनीचे निकाल चांगले आले नसतानाही शेअरमध्ये घसरण झाली नाही. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण असताना टाटा कम्युनिकेशनचा शेअर चार टक्के वाढला. हा शेअर 1813.10 रुपयांवर ट्रेड करत होता.
शेअरमधील वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवल वाढले आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल आता 51220 कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.