इंटरनेट तंत्रज्ञानाच्या जगात जपानने मोठे काम केले आहे. जपानने जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड मिळवला आहे.
14 July 2025
जपानच्या एनआयसीटीने म्हटले आहे की, 1.02 Petabits Per Second (Pbps) इंटरनेट स्पीड त्यांनी मिळवला आहे. हे 102 कोटी Mbps च्या स्पीडचा बरोबर आहे.
नेटफ्लिक्सवरील सर्व चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड होईल, इतका हा वेग आहे. सध्या नेटफ्लिक्सची पूर्ण लायब्ररी 45,000 GB आहे.
जपानच्या या इंटरनेट स्पीडने अनेक देशांच्या इंटरनेट स्पीडला मागे टाकले आहे. जपानची नवीन इंटरनेट स्पीड अमेरिकेतील स्पीडपेक्षा 35 लाख पट जास्त आहे.
भारताचा सरासरी वेगवान इंटरनेट स्पीड 63.55Mbps आहे. भारताच्या सरासरी इंटरनेट स्पीडपेक्षा हे 1.6 कोटी पट जास्त वेगवान आहे.
NICT ने म्हटले की, सर्वात वेगवान इंटरनेटची निर्मिती करण्याचे आमचे उद्दिष्ट होते. त्यात आम्हाला यश आले आहे.
एनआयसीटीने हा वेग मिळवण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबरचा वापर केला आहे.
प्रयोगात केबलच्या १९ लूपमधून डेटा सिग्नल पास करण्यात आले. प्रत्येक लूप ८६.१ किलोमीटर लांब होता. हे इंटरनेट २१ वेळा पुनरावृत्ती झाले. यामुळे एकूण १८०८ किलोमीटर अंतर कापले गेले.