16 september 2025
Created By: Atul Kamble
मद्याचे शौकीन असणारे टेस्टसाठी कितीही किंमत मोजायला तयार असतात.आज आपण सर्वात चांगल्या व्हिस्कीची सर्वात महागडी व्हिस्की पाहणार आहोत
जॉनी वॉकरच्या ब्ल्यु लेबल व्हिस्कीला महागडी आणि लक्झरी व्हिस्कीपैकी एक मानले जाते. परंतू जॉनी वॉकरने यापेक्षाही महागडी व्हिस्की बाजारात उतरवली आहे. ज्याची किंमत करोडो रुपये आहे.
जगातील सर्वात महागडी आणि दुर्लभ व्हिस्कीपैकी एक आहे The John Walker Master's Edition' हीची किंमत 1,90,000 डॉलर ( सुमारे 1.5 कोटी रु.)तर ब्ल्यू लेबलची किंमत 30 हजार रुपये आहे.
ही व्हिस्की 50 वर्षे जुन्या सिंगल माल्ट्सपासून बनली आहे. यास स्कॉटलँडच्या दुर्लभ डिस्टीलरीजमधून गोळा केले आहे.ही इतकी दुर्मिळ आहे.खूप कमी लोकांना तिला पाहता येते.तिचे उत्पादन खूप कमी प्रमाणात केले आहे
या व्हिस्कीची बाटली क्रिस्टलपासून बनली आहे.त्यामुळे तिची लक्झरी व्हॅल्यू वाढते.तिला एका हँडक्राफ्ट लक्झरी बॉक्समध्ये पॅक केले आहे.हिच्यात असे माल्ट्स वापरले आहे जे आता बनत नाही.म्हणून ती दुर्लभ आहे
ही व्हिस्की केवळ हाय-प्रोफाईल कलेक्टर्स आणि लक्झरी ब्रँड्ससाठी उपलब्ध आहे. सर्वसाधारण बाजारात ती मिळत नाही.
जॉनी वॉकर जगातला सर्वात प्रतिष्ठीत व्हिस्की ब्रँडपैकी एक आहे.हा ब्रँड दोनशे वर्षांहून जुना असून लक्झरी व्हिस्कीसाठी ओळखला जातो.
ही व्हिस्की केवळ पिण्यासाठी नसून ती गुंतवणूक आणि कलेक्शनसाठी परफेक्ट आहे.जर कोणाकडे ही व्हिस्की असेल तर त्याच्याजवळ खूप अनमोल खजाना आहे.