969 रुपयांच्या या हेल्मेटची बाजारात चलती, 1 कोटी लोकांची पसंती, अखेर काय आहे यात...

Created By: Atul Kamble

19 April 2026  

भारतात दुचाकी चालकांचे सर्वाधिक अपघात होत असल्याने हेल्मेटचे महत्व वाढले आहे.

स्टीलबर्ड हायटेक इंडिया लि.ने तिच्या ROX हेल्मेट मालिकेने बाजारात मोठे स्थान मिळवले आहे.

कंपनीने घोषणा केली की बाजारात एक कोटीहून जास्त ROX मालिकेचे हेल्मेट विकले गेले आहेत.

या मागे या हेल्मेटची कमी किंमत  जबाबदार असून त्याची सुरुवातीची किंमत केवळ 969 रुपयांपासून सुरु होते.

चांगली क्वालिटी आणि कमी किंमत असल्याने तरुणांना ही हेल्मेट खूप आवडताहेत.

स्टीलबर्ड कंपनीचे हे हेल्मेट आयएसआय सर्टिफाईड असल्याने सुरक्षेच्या कसोटीवर खरे उतरले आहेत

कंपनीने टियर-1, टियर-2 शहरे आणि ग्रामीण भागातही वितरण प्रणाली राबविली आहे.

स्टीलबर्डने गेल्या आर्थिक वर्षात ८७ लाख हेल्मेटची विक्री केली आहे. तिचा आणखी विस्तार सुरु आहे.

स्टीलबर्ड रॉक्स सिरीज विविध कलरमध्ये हेल्मेट विकते.८०० ग्रॅम वजनाचे हे हेल्मेट बेसिस फिचर्सने सुसज्ज असले तरी मजबूती चांगली आहे.