मशरुममध्ये कोणते व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात ?

Created By: Atul Kamble

19 April 2026  

मशरुम ही भाजी किंवा फळ नाही तर ती एक प्रकारची बुरशी किंवा कवक आहे. जे प्रकाश संश्लेषण  देखील करत नाही. परंतू पोषक तत्वांनी भरपूर असते.

जगभरात मशरुमच्या अनेक जाती आहेत. चीनमध्ये सर्वाधिक उत्पादन केले जाते. शिटाके, गुच्छी, पोर्टोबेलो, ऑयस्टर आणि बटण मशरुम अशा जाती आहेत.

 भारतील व्हाईट मशरुम खाल्ले जाते. ज्यास बटण मशरुम म्हटले जाते. चला यात कोणती पोषक तत्वे असतात ते पाहूयात.

शाकाहारी लोकांनी व्हिटामिन्स डी हवे तर त्यांनी मशरुमचा आहारात वापर करावा.

युएसच्या कृषी विभागाच्या मते व्हाईट मशरुममध्ये व्हिटामिन सी, बी-9, डी-2, डी-3 आणि के आढळते.

व्हाईट मशरुममध्ये कॅल्शियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर सारखे मिनरल्स आढळतात.

हेल्थ लाईनच्या मते मशरुम हृदयासाठी चांगले असते. डायजेशन आणि गट हेल्थ वाढवते.हाडांना मजबूत करण्यापासून ब्लड शुगर नियंत्रित करते.