उद्योगपती मुकेश अंबानी आशियात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठा उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहे.

 मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांच्या कंपनीतील दुसरा व्यक्ती जास्त पगार घेतो.

मुकेश अंबानी आणि रिलायन्सचे व्हिजन सांभाळणारा हा व्यक्ती म्हणजे निखिल मेसवानी आहे.

मुकेश अंबानी यांचे गुरू रसिकलाल मेसवानी यांचे निखिल मेसवानी हे सुपूत्र आहेत. 

निखिल रिलायन्सच्या संस्थापकांपैकी एक असून रिफायनरी व्यवसाय ते सांभाळत आहे.

निखिल मेसवानी यांना 24 कोटी रुपये पगार मिळत असल्याचे माध्यमांमध्ये वृत्त दिले आहे. त्यांचा धाकटा भाऊ हितल मेसवानी यांचा पगारही 24 कोटी रुपये आहे. 

स्वतः मुकेश अंबानी यांचा पगार 14 कोटी रुपये आहे. मात्र, मुकेश अंबानी यांनी कोरोनानंतर एक रुपयाही पगार घेतलेला नाही.