सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी आली आहे. 11 सप्टेंबरपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आली आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 11 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत या योजनेमध्ये सोने घेते येणार आहे.
या योजनेत सोने घेण्यासाठी एक ग्रॅमला 5,923 हजारांचा दर जाहीर झाला आहे. योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करु शकता.
ऑनलाइन सोने घेण्यासाठी 50 रुपयांची सुट मिळणार आहे. 5,873 रुपयांमध्ये एक ग्रॅम सोने घेता येणार आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये 24 कॅरेट म्हणजे 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक केली जाते.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड एक सरकारी बॉन्ड आहे. यामध्ये एक ग्रॅम सोन्याची जी किंमत असते ती किंमत बॉन्डची असते.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवलेल्या सोन्यावर अडीच टक्के व्याजसुद्धा दिले जाते. यामध्ये कमीत कमी एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलो सोने घेता येते.
या योजनेचा कालावधी आठ वर्षांचा आहे. मॅच्युरिटीनंतर कोणताही कर भरावा लागत नाही.
हे ही वाचा
G 20 मधील विदेशी पाहुणे साडी अन् ड्रेसमध्ये