AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pariksha Pe Charcha : मोदींसाठी विद्यार्थ्यांनी आणला टिफिन, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील पदार्थ; काय होतं त्यात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेचा ताण कसा हाताळावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि स्टार्टअप्समध्ये कसे लक्ष केंद्रित करावे, यावर त्यांनी महत्त्वपूर्ण कानमंत्र दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदींसाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील खास खाद्यपदार्थांचा टिफिन आणला होता, ज्याचा आस्वाद घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Pariksha Pe Charcha : मोदींसाठी विद्यार्थ्यांनी आणला टिफिन, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील पदार्थ; काय होतं त्यात?
पंतप्रधान मोदी
| Updated on: Feb 09, 2026 | 12:09 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परीक्षेच्या काळातील ताणतणाव आणि अभ्यासाचं नियोजन यावर त्यांनी विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या आहेत. तसेच परीक्षेबाबतच्या काही खास गोष्टीही त्यांना सांगितल्या. तुम्ही वर्गातील सर्वात ढ मुलांशी मैत्री करा. ही टेक्निक तुम्हाला उपयोगी पडेल. त्या मुलाला सांगा आज मी तुला गणितं शिकवतो. त्याला शिकवण्यासाठी तुमच्या मेंदूला ताण द्या. त्यामुळे त्याला शिकवता शिकवता तुमचा विषय तोंडपाठ होईल. आणि त्याचा तुम्हाला थेट परीक्षेत फायदा होईल, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदींसाठी काही खाद्यपदार्थही आणले होते.

परीक्षे पे चर्चाचा हा दुसरा एपिसोड होता. मोदींनी सुरुवातीलाच हा कार्यक्रम वेगळा आणि खास असल्याचं स्पष्ट केलं. देशाच्या वेगवेगळ्या भागात परीक्षे पे चर्चा हा कार्यक्रम झाला पाहिजे, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळेच मी देशातील विविध भागात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, असं मोदी म्हणाले. त्यामुळेच मोदींनी यावेळी तामिळनाडूच्या कोयंबतूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

स्टार्टटप सुरू करा…

मी अनेक वर्षापासून परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आलोय. त्यांच्याकडून शिकण्यासाठी मी संवाद साधत असतो. मी जेव्हा त्यांना भेटतो, त्यावेळी ते स्टार्टअप्सबाबत विचारत असतात. आपल्याला भविष्यात काय करायचं हे आधी विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही स्टार्ट्सअप्स टेक्नॉलॉजीवर फोकस करू शकता. तुमचे मित्र वेगवेगळ्या फिल्डमध्ये एक्सपर्ट असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत स्टार्टअप्स सुरू करू शकता, असंही मोदी म्हणाले.

मोदींसाठी टिफिन

यावेळी विद्यार्थ्यांनी घरून टिफिन आणला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा खास टिफिन आणला होता. यावेळी एका विद्यार्थ्याने मोदींना चकली दिली. त्यावेळी चकली कशी बनते? असा सवाल मोदींनी केला. त्यावर बेसनाला गोल आकार देऊन तळून काढतात. चकली कुरकुरीत आणि तिखट असते, असं या विद्यार्थ्याने सांगितलं. दिवाळीत चकली अधिक बनवली जाते, असंही त्याने सांगितलं. तर दुसऱ्या विद्यार्थीनीने मोदींना छत्तीसगडी खुरमी दिली. गुळ, पीठ आणि सूजी पासून खुरमी बनवल्या जात असल्याचं तिने सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व पदार्थांचा अस्वाद घेतला. तसेच आपल्या हाताने इतर विद्यार्थ्यांनाही हे पदार्थ खाऊ घातले.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?