AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?

Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 21, 2026 | 3:37 PM
Share

दसरा मेळाव्यात व्यासपीठावरील जागेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजकांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. "मला कोपऱ्यात टाकलं, इकडचे लोक दिसत नव्हते," असे म्हणत त्यांनी पुढील वेळी योग्य व्यवस्था करण्याची सूचना केली. मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या मेळाव्यात शिंदेंनी भाषणादरम्यान आयोजकांना खडेबोल सुनावले.

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त केली. व्यासपीठावरील आपल्या जागेवरून उपस्थित शिवसैनिक दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय?”, असे प्रश्न विचारत शिंदेंनी व्यासपीठावरूनच आयोजकांना खडेबोल सुनावले.

दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व असल्याने संपूर्ण राज्याच्या नजरा शिंदेंच्या भाषणाकडे लागल्या होत्या. भाषणासाठी तयार करण्यात आलेल्या पोडियमच्या मागच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि वाघाचा फोटो लावण्यात आला होता. शिंदेंनी याच ठिकाणाहून आपले भाषण पूर्ण केले. मात्र, भाषण संपल्यावर शिंदे पुन्हा पोडियमवर आले आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

“अरे इकडचे लोक तर मला दिसतच नव्हते. पुढच्या वेळेपासून ही काळजी घ्या,” असे ते म्हणाले. भविष्यात लोकांना समोर ठेवून योग्य ठिकाणी व्यवस्था करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “पुढच्या वेळेस मी बरोबर लोकांच्या समोर मध्ये पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या घटनेमुळे आयोजनातील त्रुटी समोर आल्या.

 

Published on: Oct 21, 2026 03:37 PM

Follow Us