बजेट 2026
आपण प्रत्येकजण आपल्या खर्चाचा पूर्ण तपशील ठेवत असतो. सामान्य माणूस जसा जमाखर्च मांडत असतो. तसाच सरकारही जमाखर्च मांडत असते. त्यालाच बजेट असं म्हटलं जातं. सरकार जेव्हा अर्थसंकल्प मांडत असते तेव्हा त्यात पैसा कुठून जमा करणार आणि कशावर खर्च करणार? याचा ताळेबंद असतो. बजेट हा शब्द मूळचा फ्रेंचमधील आहे. फ्रेंच भाषेत त्याला ‘Bougette’ असं म्हणतात. सामान्य भाषेत बजेटला छोटी बॅगही म्हणतात. म्हणूनच कदाचित अर्थमंत्री बजट सादर करताना संसदेत चमड्याची छोटी बॅग घेऊन दाखल होतात. सध्या मोदी सरकारमधून चमड्याची बॅग गायब झाली आहे. त्याजागी लाल वहीखातं आणि डिजिटल टॅबलेट आलं आहे. भारताच्या बजेटचा इतिहास 1860 पासून सुरू होतो. सुरुवातीला बजेट 28 फेब्रुवारी रोजी संध्यकाळी 5 वाजता सादर व्हायचा. 1999 नंतर हा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर करण्याची प्रथा सुरू झाली. 2014पासून बजेटची तारीख बदलण्यात आली. 1 फेब्रुवारी रोजी बजेट (Union Budget) सादर केला जाऊ लागला.
शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर मोठा आरोप
Raju Shetti : मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे.ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यावर राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Mar 6, 2026
- 6:19 pm
शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही पूर्ण केलं, विकसित महाराष्ट्राची थीम असलेला अर्थसंकल्प – CM फडणवीस
CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Mar 6, 2026
- 5:31 pm
Maharashtra Budget 2026 : कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी सरकारला जोरदार टोला लगावला आहे, तसेच त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून देखील जोरदार हल्लाबोल केला.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 6, 2026
- 5:08 pm
आता मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर, राज्याच्या अर्थसंकल्पात फडणवीसांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईकरांसाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 6, 2026
- 4:25 pm
Devendra Fadnavis | अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी हायपरफॉर्मन्स सेंटर्सची घोषणा
महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडताना शेतकरी, महिला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रांसाठी विविध महत्त्वपूर्ण तरतुदी जाहीर केल्या. यावेळी राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती दिली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 6, 2026
- 4:10 pm
Maharashtra Budget 2026 : शेतकऱ्यांपासून गावकऱ्यांपर्यंत, घरांपासून बुलेटपर्यंत, कुणासाठी काय? जाणून घ्या संपूर्ण बजेट
Maharashtra Budget 2026 Big Announcement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात गावापासून शहरांपर्यंत, शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांसाठी अनेक घोषणांचा समावेश आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Mar 6, 2026
- 4:27 pm
Maharashtra Budget 2026: लखपदी दीदी ते एकल महिला..; महिला दिनापूर्वीच फडणवीसांची महिलांना मोठी भेट, कोणकोणत्या घोषणा?
Maharashtra Budget 2026: राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत महिलांसाठी या बजेटमध्ये काय विशेष तरतुदी आहेत, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Mar 6, 2026
- 3:40 pm
Devendra Fadnavis | अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात लाडकी बहिण योजनाबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना यापुढेही सुरू राहणार असून योजनेकरिता आवश्यक भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 6, 2026
- 3:34 pm
Devendra Fadnavis : नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
अर्थसंकल्प २०२६ मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा केली. यासोबतच, अनुसूचित जाती, आदिवासी, इतर मागासवर्ग, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना व महामंडळांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 6, 2026
- 3:28 pm
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 अंतर्गत, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत. यात रस्ते, विमानतळ, बंदर विकास आणि जलवाहतुकीच्या विस्तारीकरणावर भर दिला आहे. तसेच, ऊर्जा क्षेत्रात स्वच्छ ऊर्जा आणि शेतीसाठी मोफत वीज योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 6, 2026
- 3:20 pm
Devendra Fadnavis On Farmers | प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 6, 2026
- 3:16 pm
Maharashtra budget : राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होईल. तसेच, हरित क्षेत्र वाढवण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड आणि अनेक नदीजोड प्रकल्पांसह जलव्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 6, 2026
- 3:13 pm