AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात

नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात

| Updated on: Mar 09, 2026 | 10:32 AM
Share

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. ७५० हून अधिक दिंड्या दाखल झाल्या असून, गोदावरीच्या काठी वारकऱ्यांचा मोठा मेळावा भरला आहे. भक्तिमय वातावरणात भाविकांनी संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा सोहळा ११ तारखेपर्यंत चालणार असून, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. पैठण नगरीत सध्या भक्तिमय आणि चैतन्याचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ७५० पेक्षा अधिक दिंड्या या सोहळ्यासाठी पैठणमध्ये दाखल झाल्या आहेत. या दिंड्या गोदावरी नदीच्या काठी विसावल्या असून, वारकऱ्यांनी संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

फाल्गुन वैद्य षष्ठी या तिथीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्याने हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. वारकऱ्यांच्या मुखातून “एकनाथ, भानुदास, विठ्ठल, ज्ञानबाचा गजर” आणि “भानुदास एकनाथाचा जयघोष” ऐकू येत आहे. हातात टाळ-मृदंग, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि भगवा ध्वज घेतलेले वारकरी भक्तिरसात लीन झाले आहेत. प्रशासनाने भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. हा सोहळा पुढील काही दिवस मोठ्या उत्साहात सुरू राहणार आहे.

Published on: Mar 09, 2026 10:32 AM
Follow Us