बजेट 2024

1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम बजेट सादर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा बजेट असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामण यांचाही हा शेवटचा बजेट असणार आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होतील. म्हणूनच 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट सादर केला जाणार आहे. हा बजेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडला जाणार असल्याने या बजेटमध्ये का असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नोकरदार वर्गापासून ते उद्योगजगतापर्यंत आणि गृहिणींपासून ते पायाभूत प्रकल्पांपर्यंत या बजेटमध्ये काय दिलं जाणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. कृषी, आरोग्य आणि रेल्वे आदी विभागांवर बजेटमध्ये सवलतींचा वर्षाव होणार का? याकडेही लक्ष लागलं आहे. तसेच करदात्यांना करातून सवलत मिळणार का? याकडेही देशाचं लक्ष लागलं आहे.

अर्थसंकल्प 2024 शी संबंधित प्रश्न आणि त्याची उत्तरे…

प्रश्न – या वर्षीचा बजेट कधी सादर होणार?

उत्तर – 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत.

प्रश्न – हा संपूर्ण बजेट असेल की अंतरिम असेल?

उत्तर – 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असेल

प्रश्न – या अर्थसंकल्पातून महागाई रोखण्याचा प्रयत्न होईल?

उत्तर – वाढत्या महागाईची सरकारलाही चिंता आहे. त्यामुळे महागाई रोखण्यासाठी या अर्थसंकल्पातून प्रयत्न केले जाऊ शकतात.

प्रश्न – ऑटो इंडस्ट्रीसाठी अर्थमंत्री तिजोरी उघडतील काय?

उत्तर – बजटमधून ऑटो इंडस्ट्रीला बूस्टर मिळू शकतं. विशेषकरून ईव्हीची विक्री वाढवण्यावर जोर दिला जाऊ शकतो.

प्रश्न – अर्थसंकल्पात गृह कर्जावरील करात सवलत मिळू शकते का?

उत्तर – यावेळी केंद्र सरकार होम लोनवरील आयकराच्या सवलतीची मर्यादा 2 लाखावरून 5 लाखांपर्यंत करण्याची शक्यता आहे.

प्रश्न – अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गाला सर्वात आधी कुणी लाभ मिळवून दिला होता?

जवाब – इंदिरा गांधी सरकारच्या कार्यकाळात 1974च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच स्टँडर्ड डिडक्शन सुरू करण्यात आलं होतं.

प्रश्न – बजटपूर्वी हलवा सेरेमनी का साजरा केला जातो?

उत्तर – कोणतंही शुभ काम करण्यासाठी गोड खाल्ललं पाहिजे, अशी प्रथा आहे, त्यामुळे बजेटसारख्या इव्हेंटपूर्वी हलवा सेरेमनीचं आयोजन केलं जातं.

प्रश्न – रेल्वे अर्थसंकल्पाचं मुख्य अर्थसंकल्पात विलिनीकरण कधी करण्यात आलं?

उत्तर – 2016मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शेवटचा रेल्वे बजेट सादर केला होता. त्यानंतर स्वतंत्रपणे अर्थसंकल्प सादर करण्याची ही परंपरा बंद करून मुख्य अर्थसंकल्पात रेल्वे बजेटचं विलिनीकरण करण्यात आलं.

प्रश्न – अर्थसंकल्पात पहिल्यांदाच टॅक्स स्लॅबमध्ये बदल कधी करण्यात आला होता?

उत्तर – स्वतंत्र भारतात सर्वात पहिल्यांदा 1949-50च्या दशकात टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आला होता.

प्रश्न – देशाची टॅक्स सिस्टिम सर्वात आधी कुणी बनवली होती.

उत्तर – 1992-93 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी ओल्ड टॅक्स रिजीम सिस्टम तयारी केली होती.