बजट 2026-27 हायलाईट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत देशातील जनतेच्या केंद्र सरकारकडे प्रचंड अपेक्षा आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार आणि करदात्यांना मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आयकर रचनेत बदल होईल, करात सवलत मिळेल, नवीन कर रचनेतही सूट मिळेल, अशी आशा नोकरदार वर्गाला आहे. भारत हा जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. येत्या काळात भारत तिसरी जागतिक अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचाही रोड मॅप मांडला जाण्याचे संकेत आहेत.
यंदाच्या बजेटमध्ये नोकरदार वर्गासह, कृषी, महिला, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर अधिक खर्च केला जाण्याची शक्यता आहे. मध्यम वर्ग, सामान्य माणूस, कार्पोरेट, शेतकरी, सेवा क्षेत्र, कृषी आणि रेल्वे सेवेवर बजेटमध्ये अधिक भर दिला जाऊ शकतो. या सर्व क्षेत्रावर बजेटमधून काय काय दिलं जाणार? बजेटमध्ये कुणासाठी काय दिलंय? कोणत्या नव्या घोषणा करण्यात आल्या? काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालंय? याची प्रत्येक अपडेट इथे देत आहोत. त्यामुळे या पेजला ट्रॅक करत राहा.
Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
अर्थसंकल्प 2026 मध्ये निर्मला सीतारमण यांनी कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. यंदाचा हा अर्थसंकल्प गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी कर्करोग (Cancer), मधुमेह (Diabetes) आणि स्वयंप्रतिकार रोगांच्या (Auto-immune diseases) औषधांच्या किंमती कमी करण्यावर सरकार मोठा भर देणार असल्याची घोषणा केली. 10 हजार कोटींच्या 'बायो-फार्मा शक्ती' मिशनमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Union Budget 2026 Live : परदेश प्रवास होणार स्वस्त
परदेशात प्रवास करण्याची योजना जे आखत असतील त्यांच्यासाठी बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. परदेशी दौऱ्याच्या पॅकेजेसवरील कर (TCS) 5%-20% वरून आता 2% करण्यात आला आहे. तसेच आता किमान रकमेची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच आता आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बुकिंग करताना कमी कर भरावा लागेल. सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन करताना रोख प्रवाह कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असे अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.
बजेट सादर होताच शेअर मार्केट कोसळलं
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात लक्षणीय घसरण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये 1900 अंकांनी घसरण झाली आहे.
Union Budget 2026 Live : काय होणार स्वस्त, अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं ?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विडी स्वस्त होणार आहे. शूज देखील स्वस्त होतील. कापड निर्यात देखील स्वस्त होईल. बॅटरी देखील स्वस्तहोणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
Union Budget 2026 Live : सर्वसामान्यांना करदात्यांना दिलासा नाही, टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Nirmala Sitharaman Speech LIVE : लाडक्या बहिणींसाठी मोठ्या घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी महिलांसाठी SHE (Self-help Entrepreneur) मार्ट्सला कम्युनिटी-स्वामित्व देणाऱ्या किरकोळ दुकानोंमध्ये रुपांतरीत करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महिला उद्योजिकांना मोठं बळ मिळणार आहे.
Union Budget 2026 Live : कॅन्सरशी संबंधित 17 औषधांसाठी सवलत जाहीर
कॅन्सरशी संबंधित 17 औषधांना सवलत दिली जाईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. विशिष्ट वैद्यकीय कारणांसाठी इतर सात दुर्मिळ आजारांच्या औषधांच्या आयातीला सूट दिली जाईल.
देशात 3 नवीन एम्सची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 3 नवीन ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ़ मेडिकल सायन्सेसची (AIIMS) स्थापना करण्याची घोषणा केली आहे.
Nirmala Sitharaman Speech : नॉर्थ ईस्ट राज्यांसाठी बुद्ध सर्किटची घोषणा
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे. नॉर्थ ईस्ट राज्यांसाठी बुद्ध सर्किट तयार करण्यात येणार आहे. हे सर्किट अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Union Budget 2026 Live : करचोरी प्रकरणात शिक्षा नव्हे फक्त दंड
इनकम टॅक्स रिटर्नमध्ये गडबड केल्यास, उत्पन्न लपवल्यास आता शिक्षा होणार नाही, त्याऐवजी दंड ठोठावण्यात येईल. अर्थमंत्र्यांनी 30 टक्के कर जाहीर केला आहे. याचा अर्थ असा की, उत्पन्न लपवणाऱ्यांना आता दंड आकारला जाणार नाही; त्यांच्यावर 30 टक्के कर आकारला जाईल. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंतच ठेवण्यात आली आहे.
भारतात डेटा सेंटर सुरू करणाऱ्यांना मोठी सूट
भारतात डेटा सेंटर सुरू करणाऱ्यांना आता मोठी सूट दिली जाणार आहे. बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
Union Budget 2026 Live : परदेश प्रवास होणार स्वस्त
आता इन्कम टॅक्स भरणं सोपं होणार आहे. मोटार अपघात क्लेमवर आता व्याज लागणार नाही. परदेश प्रवास आता स्वस्त होईल असेही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पॅकेजवरील कर कमी होईल.
Nirmala Sitharaman Speech : She-Mart ची घोषणा
महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी SHE (Self-help Entrepreneur) मार्क्स समुदायाच्या मालकीच्या रिटेल स्टोअर्स म्हणून स्थापन केले जातील असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
Budget 2026 LIVE Updates : इनकम टॅक्सबद्दल मोठी घोषणा
आत्मनिर्भर भारतासाठी 2 हजार कोटी रुपये. याशिवाय , प्राप्तिकर फॉर्म (Income Ta Forms) भरण्याची पद्धत सोपी केली जाईल. 1 एप्रिल 2026 पासून नवीन कायदा लागू केला जाणार आहे. सुधारित आयटीआरला 31 मार्चपर्यंत भरता येणार आहेत.
Nirmala Sitharaman Speech : 'खेलो इंडिया मिशन'ची घोषणा
क्रीडा क्षेत्र रोजगाराची, कौशल्य विकासाची आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देतं. खेलो इंडिया कार्यक्रमाद्वारे सुरू करण्यात आलेल्या क्रीडा प्रतिभेच्या पद्धतशीर कार्याला पुढे नेत, पुढील दशकात क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून यावे यासाय़ी ‘खेलो इंडिया मिशन’ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडत आहे असं अर्थमंत्री म्हणाल्या.
सरकार कंटेंट क्रिएटर्ससाठी लॅब करणार स्थापन
अर्थसंकल्पात कंटेंट क्रिएटर्ससाठी लॅब तयार करण्याची घोषणा करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 2030 पर्यंत भारताला AVGC क्षेत्रात 20 लाख व्यावसायिकांची आवश्यकता असेल. 15 हजार माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज, मुंबईला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आहे.
Nirmala Sitharaman Speech : मानसिक आरोग्याबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
लखपती दीदी योजना यशस्वी झाली. त्यांनी कर्ज-आधारित रोजगार निर्माण करण्यात प्रगती केली. त्या स्वयंरोजगार निर्माण करत आहेत. अपंग लोकांना सक्षम बनवण्याच्या आमच्या योजनेत त्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्यांना ज्या क्षेत्रात संधी मिळतील त्या क्षेत्रात आम्ही संधी देऊ. कृत्रिम अवयव निर्मितीसाठी एक संस्था स्थापन केली जाईल. आम्ही ही केंद्रे मजबूत करू. मानसिक आरोग्याबाबत मोठी घोषणा करताना निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, मेंटल इंस्टीट्यूट मजबूत केले जाईल.
Nirmala Sitharaman Speech : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता पशुपालनासाठी कर्ज दिले जाईल. काजू आणि कोकोसाठी समर्पित प्रस्ताव आहेत. चंदनाच्या जतनासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.
देशभरात 5 ठिकाणी तयार करणार मेडिकल हब
- देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब तयार करण्यात येणार आहेत.
- आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या नव्या संस्था स्थापन करणार
- डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार
- पशुवैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य देणार
Nirmala Sitharaman Speech : प्रत्येक जिल्ह्यात गर्ल्स हॉस्टेल
- प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल , वसतीगृह बांधलं जाईल.
- विकसित भारतासाठी बँकिंगवर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव.
- पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि ग्रामीण विद्युतीकरण कॉर्पोरेशनची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव.
- परकीय चलन व्यवस्थापन नियमांचा सर्वंकष आढावा घेतला जाईल.
- कॉर्पोरेट बाँड्सवर परिपूर्ण परतावा स्वॅप सुरू करण्याचा प्रस्ताव.
- मोठ्या शहरांमध्ये उच्च-मूल्याच्या नगरपालिका रोख्यांना प्रोत्साहन देण्यावर भर.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
खगोलशास्त्राला प्रोत्साहन दिले जाईल. 20 हजार तरुणांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित केले जाईल. कंटेंट क्रिएटर लॅबची स्थापना केली जाईल.
Nirmala Sitharaman Speech : 7 नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा
7 नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.
• मुंबई-पुणे
• पुणे-हैदराबाद
• हैदराबाद-चेन्नई
• हैदराबाद-बंगळुरू
• चेन्नई-बंगळुरू
• दिल्ली-वाराणसी
• वाराणसी-सिलीगुड़ी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, शहरांमधील विकासाला जोडण्यासाठी सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. व्यावसायिक संस्थांना कॉर्पोरेट मित्रांची एक कॅडर तयार करण्यास मदत केली जाईल.सेमीकंडक्टर उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही ISM 2.0 लाँच करू. कर्जाची अंशतः हमी देण्यासाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी स्थापन केला जाईल. पर्यावरणपूरक कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रस्तावांवर काम सुरू आहे. पुढील पाच वर्षांत 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू केले जातील. सरकारी भांडवली खर्च 12.2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
Budget 2026 LIVE Updates : बँकिंगसाठी कमिटी करणार स्थापन
निर्मला सीतारामण यांनी या अर्थसंकल्पातून आर्थिक ताळेबंदावरही लक्ष ठेवलं आहे. वित्तीय स्थिरता मिळावी म्हणून देशातील बँकिंगसाठी एक कमिटीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी उच्चतम स्तरावर काम करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
3 राज्यांमध्ये खनिज कॉरिडॉर- अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तीन राज्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा आणि केरळ येथे खनिज कॉरिडोअर होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केलं.
Budget 2026 LIVE Updates : राष्ट्रीय फायबर योजनेची घोषणा
निर्मला सीतारामण यांनी राष्ट्रीय फायबर योजनेची घोषणा केली आहे. रेशम, जूट आणि वूलनसाठी ही योजना फायदेशीर होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विणकरांना मोठा फायदा होणार आहे.
Nirmala Sitharaman Speech : गावांसाठी पेटारा उघडला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गावांसाठी पेटारा उघडला आहे. महात्मा गांधी ग्राम स्वराज इनिशिएटिव्हला प्राधान्य देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे विणकर आणि कुटीर उद्योगांना फायदा होणार आहे. गरीब ग्रामीण युवांसाठी याचा फायदा होणार आहे. तसेच खेळाशी संबंधित उत्पादनाची निर्मिती करण्यावरही त्यांनी जोर दिला आहे.
MSME साठी 10 हजार कोटींची घोषणा...
MSME विकासासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. हे रस्ते चॅम्पियनसारखे तयार करण्यात यावेत असं मला वाटतं. त्यासाठी आम्ही 10 हजार कोटींची तरतूद करत आहोत. त्यामुळे उद्योगांना फायदाच होणार आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं.
आत्मनिर्भर भारतासाठी भारत सरकारने उघडली तिजोरी
सरकारने आत्मनिर्भर भारतासाठी आपली तिजोरी उघडली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी 2 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. टियर 2 आणि टियर 3 शहरे विकसित केली जातील. 5 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे विकसित केली जातील.
कॅन्सर आणि मधुमेहावरची औषधे स्वस्त होणार, मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज कॅन्सर आणि डायबिटीससारख्या (मधुमेह) दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना मोठा दिलासा दिला आहे. कॅन्सर आणि शुगरची औषधे स्वस्त करण्याची घोषणा सीतारामण यांनी केली आहे.
नवीन 22 जलमार्ग बनवणार, मोठी घोषणा
देशात 22 नवीन जलमार्ग बनवणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा. नव्या जलमार्गामुळे देशाची सागरी वाहतूक व्यवस्था बळकट होणार.
डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडोअरची घोषणा
निर्मला सीतारमण यांनी नोव्हेंबर 2025मध्ये रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्ससाठी एक योजना सुरू केली होती. आता ओडिशा, केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूसारख्या खनिज समृद्ध राज्यांसाठी डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडोअर स्थापन केलं जाणार आहे. तसा प्रस्ताव आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ठेवला आहे.
बजेटमध्ये आत्तापर्यंत काय ?
- बायोफार्मास्युटिकल्ससाठी 10 हजार कोटी रुपये
- सेमीकंडक्टरसाठी 40 हजार कोटी रुपये
- महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना सुरू
- स्वदेशी कापडांसाठी विशेष मदत
- मेगा टेक्सटाईल पार्क बांधले जाणार
- कंटेनर उत्पादनासाठी 10 हजार कोटी रुपये
Semiconductor Mission 2.0 होणार लॉन्च
बजेट 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट भाषणात कन्स्ट्रक्शन आणि पायाभूत इक्विपमेंटच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी एक नवीन योजना आणणार असल्याचं सांगितलं. या सेमी कंडक्टर मिशनचा योजनेचा हेतू मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्याचा आहे. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला मजबूत करणार आहे.
बायोफार्मासाठी सरकारकडून 10 हजार कोटी
बायोफार्मास्युटिकल्सवर आमचे लक्ष असेल. आम्ही 10 हजार कोटी अलॉट करत आहोत. तीन संस्था स्थापन केल्या जातील. सध्या आमच्याकडे सात संस्था आहेत, ज्यांचा आणखी विस्तार केला जाईल. - अर्थमंत्री निर्मला सीतारमण
अर्थसंकल्प युवाशक्तीवर आधारित- निर्मला सीतारमण
देशांतर्गत उत्पादन क्षमता निर्माण झाली आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. सरकारने लोकसंख्येपेक्षा सामान्य लोकांना प्राधान्य दिले. सरकारने वक्तृत्वापेक्षा सुधारणांना प्राधान्य दिले. धोरणात्मक निर्णयांमुळे मजबूत आर्थिक स्थिरता सुनिश्चित झाली. विकासाचे फायदे शेतकरी आणि अनुसूचित जातींसह सर्वांपर्यंत पोहोचावे, अशी आमची इच्छा आहे. आमचा हा अर्थसंकल्प युवाशक्तीवर आधारित अर्थसंकल्प आहे
केंद्रीय अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली आहे. त्या 2026- 27 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारमण या तब्बल नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. त्या काय घोषणा करतात, काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. संसद भवनात मंत्रिमंडळाची बैठक झाली, तिथे भजेटला त्याला मंजुरी देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण थोड्याच वेळात सुरू होईल.
निर्मला सीतारमण कॅबिनेट बैठकीसाठी दाखल
बजेटपूर्वी मंत्रीमंडळाची बैठक सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बैठकीसाठी पोहोचल्या आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजू, राम मोहन नायडू आणि जी. किशन रेड्डी उपस्थित आहेत.
लाडक्या बहिणींसाठी होणार का मोठी घोषणा ?
थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या संसदेत 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पादरम्यान लाडक्या बहिणींसाठी काही मोठी घोषणा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी पोहोचले संसदेत
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी, संसद भवनात थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप दिले जाईल. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह सर्व मंत्री संसद भवनात पोहोचले .
राष्ट्रपती भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण दाखल
थोड्याच वेळात देशाचे बजेट सादर होणार आहे. तत्पूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामण राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या. निर्मला सीतारामण आणि राष्ट्रपती यांच्यात चर्चा झाली. थोड्याच वेळात त्या राष्ट्रपती भवनातून संसदेकडे रवाना होतील.
सोनं होणार स्वस्त ? भाव उतरणार की...
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात मोठी वाढ होत आहे. सोन्याच्या किंमतींनी तब्बल दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. येत्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात यासंदर्भात काही घोषणा होते का, ग्राहकांना दिलास मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
जुनी आयकर प्रणाली रद्द होणार ?
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये जुनी आयकर प्रणाली रद्द होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गृहकर्ज, विमा प्रीमियम आणि पीपीएफबद्दल होऊ शकते मोठी घोषणा
थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 11 वाजता बजेट मांडण्यास सुरूवात करतील. जुन्या कर प्रणालीमध्ये गृहकर्ज, विमा प्रीमियम सवलत आणि पीपीएफ सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक यासारखे करलाभ उपलब्ध आहेत. मात्र, या नव्या अर्थसंकल्पात याबद्दल काही बदल होऊ शकतात. त्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय घडणार ?
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीत अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांना औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर ठीक ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होईल.
आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान, वाढणार का बजेट ?
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा लवकरच सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत हे विधेयक सादर करतील. त्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प असेल, जो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि सामान्य लोकांना सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देणे यासह अनेक महत्त्वाची आव्हाने यावेळी अर्थसंकल्पात आहेत.
अर्थसंकल्पानंतर तरुणांना नेमकं काय मिळणार ?
1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. कारण सरकारचे प्राथमिक लक्ष रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन (ELI) योजनेवर आहे, जी नवीन कर्मचारी भरती करणाऱ्या कंपन्यांना थेट आर्थिक मदत देते. तसेच पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1 कोटी तरुणांना आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण मिळण्याची आणि मासिक 6000 ते 7000 रुपये वेतन मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच लहान व्यवसायांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज देण्याचा निर्णय झाल्यास स्थानिक रोजगार वाढण्याची अपेक्षा आहे.
LPG पासून ते सिगरेटपर्यंत…1 फेब्रुवारीपासून हे मोठे बदल;
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या रविवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. नवीन महिन्यात देशासाठी अनेक गोष्टी बदलतील. काही नियमात बदल होईल. तर एलपीजीपासून ते सिगारेटपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर होतील. त्याचा थेट परिणाम प्रत्येकाच्या घरावर आणि हॉटेलिंगवर दिसेल. पान मसाला, सिगारेट पिणाऱ्यांना मोठा झटका बसेल.
Tax Calculator
Cheaper & Expensive
- परदेशात शिक्षण
- परदेश प्रवास
- मधुमेहाची औषधं
- CNG
- मायक्रोव्हेव ओव्हन
- सौर पॅनेल
- बूट
- एअरक्राफ्टशी निगडीत सामान
- विडी
- कापड निर्यात
- बॅटरी
- सिगारेट
- दारू
- भंगार
- खनिज
शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर मोठा आरोप
Raju Shetti : मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे.ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यावर राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Mar 6, 2026
- 6:19 pm
शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही पूर्ण केलं, विकसित महाराष्ट्राची थीम असलेला अर्थसंकल्प – CM फडणवीस
CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Mar 6, 2026
- 5:31 pm
Maharashtra Budget 2026 : कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी सरकारला जोरदार टोला लगावला आहे, तसेच त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून देखील जोरदार हल्लाबोल केला.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 6, 2026
- 5:08 pm
आता मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर, राज्याच्या अर्थसंकल्पात फडणवीसांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईकरांसाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Mar 6, 2026
- 4:25 pm
Devendra Fadnavis | अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी हायपरफॉर्मन्स सेंटर्सची घोषणा
महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडताना शेतकरी, महिला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रांसाठी विविध महत्त्वपूर्ण तरतुदी जाहीर केल्या. यावेळी राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती दिली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 6, 2026
- 4:10 pm