Amravati | अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या अमरावती एसटी बस स्थानकाची स्थिती चिंताजनक बनली आहे. बस डेपोची बिल्डिंग पूर्णपणे जीर्ण झाली असून, इमारतीचा काही भाग कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः बिल्डिंगमध्ये असलेली पाण्याची टाकी आणि त्याचा स्लॅब सुद्धा जीर्ण झाल्यामुळे, कोसळल्यास जीवित हानी होऊ शकते.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या अमरावती एसटी बस स्थानकाची स्थिती चिंताजनक बनली आहे. बस डेपोची बिल्डिंग पूर्णपणे जीर्ण झाली असून, इमारतीचा काही भाग कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः बिल्डिंगमध्ये असलेली पाण्याची टाकी आणि त्याचा स्लॅब सुद्धा जीर्ण झाल्यामुळे, कोसळल्यास जीवित हानी होऊ शकते, अशी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील इतर ठिकाणी सरकारी इमारती कोसळल्याच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास, अमरावती बस स्थानकातील ही दुर्दशा अधिक गंभीर ठरते. स्थानकातील इमारतीची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप तातडीची कारवाई झालेली नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. स्थानिकांनी प्रशासनाला तातडीने लक्ष देऊन इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....

