टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले…
टायगर श्रॉफच्या घराजवळील गोळीबार प्रकरणात ताब्यात घेतलेल्या गणेश लांडगेच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. गोळीबाराच्या वेळी त्यांचा मुलगा तुरुंगात होता आणि त्याला खोट्या आरोपाखाली अडकवले जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. विष्णू गँगशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला.
अभिनेता टायगर श्रॉफच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. पोलिसांनी मुंबईतून गणेश लांडगे नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर या प्रकरणात सहभागाचा आरोप आहे. मात्र, लांडगे कुटुंबीयांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत.
लांडगे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोळीबार झाला त्यावेळी त्यांचा मुलगा गणेश तुरुंगात होता. गणेशची आई आणि वडिलांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना सांगितले की, ३१ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो परवाच मुंबईला गेला होता आणि तिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. “माझ्या मुलाने काहीही केले नाही. तो विष्णू गँगमध्ये नाही,” असे त्यांच्या आईने स्पष्ट केले. पोलिसांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप लावल्याचे आणि त्यांना कारतूस व बंदुका मिळाल्याचे सांगत असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यांचा मुलगा निर्दोष असून, त्याला या गुन्ह्यात जाणूनबुजून अडकवले जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ते आपल्या मुलाच्या सुटकेची मागणी करत आहेत.
Published on: Nov 15, 2026 05:09 PM
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?

