काँग्रेस
भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
Pragya Satav Joins BJP: प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार? विधान परिषदेतही विरोधी पक्षनेता नसणार?
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी विकासाचे कारण देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या एका प्रवेशामुळे भाजपने दोन शिकार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ घटले असून, विरोधी पक्षनेतेपदावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 19, 2025
- 11:11 am
सुशील कुमार शिंदे यांच्या गडात काँग्रेसला खिंडार… माजी आमदाराने तडकाफडकी पक्ष सोडला; थेट…
Solapur Politics : ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराने असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपाची ताकद वाढली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 18, 2025
- 4:12 pm
मोठी बातमी! राज्यात काँग्रेसमध्ये भूकंप, सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचा होणार भाजपात प्रवेश
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 17, 2025
- 8:04 pm
जेव्हा चिंतेत सोनिया गांधींनी लावला अटल बिहारी वाजपेयींना फोन…तुम्ही ठीक आहात ना…मग माजी पंतप्रधानांनी काय दिले उत्तर?
Sonia Gandhi Called Atal Bihari Vajpayee: अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते. तर सोनिया गांधी या विरोधी पक्ष नेत्या होत्या. पण जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा भारतीय संस्कृती कोणताच नेता विसरत नाही याचं एक उत्तम उदाहरण सध्या समोर आलं आहे. त्याची मोठी चर्चा होत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 17, 2025
- 4:23 pm
Eknath Shinde : पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत, शिंदेंचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर पाकिस्तानची बाजू घेतल्याचा आणि लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला आहे. पैलगाम हल्ल्यातील आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्यांनी अभिनंदन केले. अशा देशविघातक वक्तव्य करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, अशी ताकीदही त्यांनी दिली.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 17, 2025
- 4:20 pm
नाराज होऊ नका, विधानसभेची उमेदवारी देतो..; सतेज पाटील यांच्या वक्तव्यानंतर पिकला एकच हशा
काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी एकाच जागेवर अनेक जण इच्छुक असल्यामुळे इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांचीही दमछाक होत आहे. दरम्यान काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी उमेदवारी देता आली नाही तर नाराज होऊ नका तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देतो असं वक्तव्य मुलाखत देण्यासाठी आलेल्या इच्छुकांसमोर केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर इच्छुकांमध्ये एकच हशा पिकला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 17, 2025
- 3:52 pm
मी का माफी मागू? ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा प्रतिप्रश्न
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या विधानावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मी माफी का मागू? हे प्रश्नच नाही. संविधानाने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे."
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 17, 2025
- 3:42 pm
Eknath Shinde: ठाण्यात एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसणार? महाविकास आघाडीला राज ठाकरेंची साथ; आज दुपारी 4 वाजता…
Mahavikas Aaghadi MNS: राज्यात महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी हायहोल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई महापालिका, ठाणे, नागपूर आणि पुणे महापालिकांचा समावेश असेल. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचा धुरंधर कोण होणार यासाठी आतापासूनच समीकरणं सुरू आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 17, 2025
- 3:05 pm
Pradnya Satav: मराठवाड्यात काँग्रेसला धोबीपछाड, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर? अशोक चव्हाण यांच्यानंतर मोठा धक्का
Pradnya Satav : हिंगोलीतील सातव कुटुंब हे काँग्रेसशी गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ आहे. माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर होता. त्यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
- Reporter Vinayak Davrung
- Updated on: Dec 17, 2025
- 11:39 am
Thackeray Brothers Alliance : मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जागा वाटपावर बैठका सुरू झाल्या आहेत. मनसेने ८० जागांची मागणी केली असून, उद्धव ठाकरेंची शिवसेना १३०-१३५ जागा लढवू शकते. काँग्रेस स्वतंत्र लढण्यावर ठाम असून, शिवाजी पार्कसाठीही रस्सीखेच सुरू आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 17, 2025
- 11:16 am
Prithviraj Chavan: Operation Sindoor मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव; पृथ्वीराज चव्हाण हे काय बोलून गेले? अशी मुक्ताफळं उधळली तरी का?
Prithviraj Chavan on Operation Sindoor: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाकीत केलं आहे. 19 डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर आता ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 16, 2025
- 10:04 pm
National Herald Case : सोनिया गांधींसह राहुल गांधींना दिलासा, ईडी आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्या या भूमिकेमुळे गांधी कुटुंबाला हे प्रकरण तात्पुरते का होईना, सुटकेचा निःश्वास घेता आला आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून हे प्रकरण 2012 पासून सुरू आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 16, 2025
- 4:11 pm