Jitendra Awhad | चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा चौकशीची मागणी केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा चौकशीची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना आव्हाड म्हणाले, “ब्लॅक बॉक्स जळू कसा शकतो? ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही. त्यामुळेच मी सातत्याने सांगत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.” चौकशी प्रक्रियेत कोणताही विलंब होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. “चौकशीला विलंब झाला की संशय वाढतो. त्यामुळे संशय दूर करायचा असेल आणि न्याय द्यायचा असेल तर चौकशी अत्यंत वेगाने व्हायला हवी,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. दरम्यान, या प्रकरणावर सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Published on: Feb 24, 2026 06:31 PM
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....

