AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: ज्यांनी मराठी, महाराष्ट्राशी बेईमानी केली… राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, वादाची ठिणगी पडणार?

Sanjay Raut on Raj Thackeray and DCM Eknath Shinde Meeting: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट झाली. त्या भेटीने पुन्हा राजकीय वादळ उठलं. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले राऊत?

Sanjay Raut: ज्यांनी मराठी, महाराष्ट्राशी बेईमानी केली... राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, वादाची ठिणगी पडणार?
संजय राऊत, एकनाथ शिंदे, राज ठाकरे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 11:39 AM
Share

Sanjay Raut on Raj Thackeray and DCM Eknath Shinde Meeting: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काल या भेटीचे फोटो सर्वत्र झळकले आणि राजकीय चर्चांना उधाण आले. या सर्व घाडमोडींवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयावर त्यांचे मत मांडले. काय म्हणाले राऊत?

शिंदेवर टीका, तर राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मौन

यावेळी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर त्याचवेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मात्र त्यांनी मौन बाळगल्याचे दिसले. त्यांना या भेटीवर प्रश्न विचारला असता तुम्ही राज ठाकरेंना विचारा, मी इतकंच सांगतो की आम्ही त्यांची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतं त्यावर आमचं बंधनं नाहीत. एकनाथ शिंदे प्रवृत्तीशी यांच्या विरुद्ध आमच टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी मराठी माणूस महाराष्ट्राशी बेइमानी केली. जे नंदनवन तुम्ही सांगतात ते शिवसेना चोरीतून झालेलं आहे. या भांडणात आमचा जय होईल. या भेटीबाबत मला काही वाटत नाही. मी त्या विषयाकडे पाहत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे. तो त्यांचा निर्णय आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

शरद पवार राज्यसभेवर?

तर शरद पवार हे राज्यसभेवर जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावर राऊत यांनी मत व्यक्त केलं. शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. त्यांच्या पक्षाकडून अजून कोणी जाहीर केलं नाही की आम्ही महाविकास आघाडीत नाही. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीत आहेत. एकत्र बसून निर्णय घेऊ. शरद पवार यांनी माझ्या कडे इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेत इच्छुक आहे. शरद पवार भाजप सोबत जाणार नाही. हे मी खात्रीने सांगतो. काँग्रेसने ती भीती बाळगू नये. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या बद्दल मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकदा बोललो आहे. एक दोन दिवसात तुम्हाला मत सांगू. महाविकास आघाडी म्हणून ती जागा म्हणून आम्ही लढणार असं ठरलं तर एकत्र बसून चर्चा होईल. राज्यसभेच्या जागेवर कोण जाईल इतर पक्षाचं मत यावर चर्चा होईल असे ते म्हणाले.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...