AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना अॅक्शन, ना रोमान्स… मुलाच्या या प्रश्नावर शाहरुखही क्षणभर थांबला, मग दिलेलं उत्तर चर्चेत

शाहरुख खान केवळ अभिनयामुळेच नाही, तर आपल्या भाषणांमुळेही चर्चेत असतो. मुंबईतील ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात त्याने प्रेम, माणुसकी आणि शांततेचा संदेश दिला. यावेळी मुलासोबतचा एक खास किस्साही सांगितला. नेमकं काय म्हणाला शाहरुख?

ना अॅक्शन, ना रोमान्स... मुलाच्या या प्रश्नावर शाहरुखही क्षणभर थांबला, मग दिलेलं उत्तर चर्चेत
shah rukh khan speechImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 21, 2026 | 11:46 PM
Share

शाहरुख खान केवळ एक चांगला अभिनेता नाही, तर तो एक उत्तम वक्ताही आहे. विविध कार्यक्रमांमध्ये तो जेव्हा भाषण करतो, तेव्हा त्याच्या बोलण्याची चर्चा होते. त्याची अनेक भाषणं याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. आता शाहरुख पुन्हा एकदा त्याच्या भाषणामुळे चर्चेत आला आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित ग्लोबल पीस ऑनर्स या कार्यक्रमात त्याने माणुसकी, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला. हिंसेऐवजी संवाद आणि भीतीऐवजी विश्वास निवडला पाहिजे, असं शाहरुख यावेळी म्हणाला.

मोठमोठ्या देशांमध्ये मोठे निर्णय घेतले जात असले, तरी माणुसकीच्या छोट्या गोष्टी विसरता कामा नयेत, असं शाहरुखने सांगितलं. या छोट्या गोष्टीच इतिहास बदलू शकतात, असंही तो म्हणाला. यावेळी शाहरुखने त्याच्या धाकट्या मुलासोबत झालेल्या एका संवादाचा किस्सा सांगितला. एकदा मुलाने त्याला प्रश्न विचारला की, द्वेषाचं प्रेमात रूपांतर कसं करता येईल? त्यावर शाहरुखने दिलेलं उत्तरही तितकंच साधं आणि महत्त्वाचं होतं.

शाहरुख म्हणाला, ‘मी त्याला सांगितलं की, हे खूप सोपं आहे. आपण सर्वांनी आज ठरवलं की हिंसेऐवजी संवाद निवडायचा, भीतीऐवजी विश्वास ठेवायचा आणि एकमेकांसोबत मिळून-मिसळून राहायचं, तर विजय नेहमी प्रेमाचाच होईल.’

मोठमोठ्या देशांमधील घडामोडी आणि निर्णय यांच्यात माणुसकीच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, असंही त्याने आवर्जून सांगितलं. द्वेषाला द्वेषाने उत्तर देण्यापेक्षा प्रेम आणि संवादाचा मार्ग निवडला, तर परिस्थिती बदलू शकते, हा विचार शाहरुखने आपल्या भाषणातून मांडला.

आगामी प्रोजेक्ट कोणता?

शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘किंग’ २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, १४ डिसेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील ‘तू मिल जाये’ हे पहिलं गाणं याआधीच प्रदर्शित झालं आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...