AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे पाऊसच पडत नाही तिथे काय अजितदादांना… आनंदराज आंबेडकरांचं दिवंगत अजित पवारांबाबत असंवेदनशील वक्तव्य

दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईवरून आनंदराज आंबेडकर यांनी राज्यकर्त्यांना लक्ष्य केले. जालन्यात रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत एक विधान केलंय ज्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

जिथे पाऊसच पडत नाही तिथे काय अजितदादांना... आनंदराज आंबेडकरांचं दिवंगत अजित पवारांबाबत असंवेदनशील वक्तव्य
Anandraj Ambedkar on Ajit PawarImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 10:52 PM
Share

रामनाथ ढाकणे, जालना, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : आपले राज्यकर्ते म्हणतात, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मात्र जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का?, असा प्रश्न आनंदराज आंबेडकर यांनी केला. जालन्यात रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी दिवंगत अजित पवार यांचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पाण्याच्या संदर्भात यापूर्वी केलेल्या विधानाचा आपण उपरोधिकपणे उल्लेख केला होता, असं स्पष्टीकरण आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं. जालन्यात रिपब्लिकन सेनेचा 28 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न,राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा पार पडला.

नेमकं काय घडलं?

रिपब्लिकन सेनेचा 28 वा वर्धापन दिन सोहळा आज जालना शहरात पार पडला. संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणी आडवा, पाणी जिरवा या मुद्द्यावर बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक विधान केलं.

‘आपले राज्यकर्ते म्हणतात की पाणी आडवा, पाणी जिरवा. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का?’ असा उपरोधिक सवाल आनंदराज आंबेडकर यांनी केला. दरम्यान, अजित पवार यांनी यापूर्वी पाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा आपण उपरोधिकपणे उल्लेख केल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं.

याशिवाय, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या प्रश्नावर येत्या काळात तालुकानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर दुष्काळाच्या प्रश्नावर मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचा इशाराही आनंदराज आंबेडकर यांनी दिला.

दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष हे आनंदराज आंबेडकर यांची सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी त्यांच्या युतीची ताकद दाखवली होती. दलित मतांचं समिकरण साधण्यात ही युती यशस्वी झाल्याचं राजकीय जाणकारांनी निकालांनंतर स्पष्ट केलं होतं.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...