संजय राऊत
संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. राज्यसभेतील खासदार आहेत. अभ्यासू पत्रकार तसेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादकही आहेत. 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाळ ठाकरे' या चित्रपटाचे राऊत यांनी लेखनही केलं आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चारवेळा निवडून आले आहेत. 2010पासून ते आतापर्यंत ते राज्यसभेवर आहेत. संसदेच्या अनेक समित्यांवर राऊत सदस्य आहेत. शिवसेनेची तोफ म्हणून राऊत यांची ख्याती आहे.
Sanjay Raut : …हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कार्यकर्त्यांना फोडून पक्षात घेणे हे श्रीमंत भिकारीपणाचे लक्षण असल्याचे राऊत म्हणाले. इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक फोडावे लागणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारे कृत्य आहे. गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावरचा लोचटपणा पाहिल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या पक्षप्रवेशाच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 25, 2025
- 5:31 pm
Sanjay Raut: त्या पक्षाचा बापच अनौरस, मनसे-शिवेसना युती होताच शिंदे सेनेवर संजय राऊतांनी डागली तोफ, फडणवीसांवर अशी केली बोचरी टीका
Sanjay Raut Criticized Eknath Shinde: मनसे आणि उद्धव सेना एकत्र आल्याने सध्या दोन्ही पक्षात चैतन्याचे वातावरण आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना जणू शंभर हत्तीचं बळ आलं आहे. आज खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि आमदारांविरोधात तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मोठ्या शाब्दिक चकमकी होण्याची शक्यता दिसत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 25, 2025
- 10:54 am
Uddhav Thackeray: फुटाल तर संपाल, उद्धव ठाकरे यांचा दिल्लीकडे बोट दाखवत तो इशारा, मराठी माणसाला काय दिला सल्ला?
Uddhav And Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या महायुतीची घोषणा एकदाची झाली. त्यांनी जागा वाटपाचा पत्ता बाहेर काढला नाही. पण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचा संदर्भ देत मोठे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी मराठी माणसाला एक सल्लाही दिला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 24, 2025
- 1:01 pm
Thackeray Brothers Alliance : उद्या 12 वाजता… ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं राज्यभरात चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीची घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी ही युती होत असून, एका पत्रकार परिषदेद्वारे घोषणा होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे नेत्यांनी म्हटले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 23, 2025
- 3:50 pm
Sanjay Raut : दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 23 तारखेच्या आधी 100 टक्के… युतीच्या घोषणेबाबत राऊत यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा लवकरच होणार आहे. मातोश्रीवर बैठका सुरू असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. २३ तारखेपूर्वी युतीची अधिकृत घोषणा धूमधडाक्यात केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 22, 2025
- 2:04 pm
Sanjay Raut : मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं, इंजिनच्या अहंकाराला चटणीसारखं ठेचलं…भाजप नेत्याची जहरी टीका, राऊतांचं प्रत्युत्तर काय?
आशिष शेलार यांनी स्वार्थी मशाल आणि इंजिनाचे निशाण मिटल्याचे वक्तव्य करत राजकीय टीका केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, शेलार यांच्या बोलण्यावर मुंबईचे, राज्याचे किंवा भाजपचे राजकारण चालत नाही. ही मुंबई मराठी माणसाची आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 22, 2025
- 1:19 pm
Saamana Editorial : हे विजयी कसे झाले? भाजप अन् त्यांचे दोन बगलबच्चे…. महायुतीच्या विजयानंतर ‘समाना’तून जोरदार टीकास्त्र
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीच्या विजयावर सामनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जनतेला भाजपच्या कारभाराला कंटाळा आला असताना, हे कसे जिंकले, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. ही निवडणूक पैसा आणि सत्तेच्या जोरजबरदस्तीने जिंकल्याचा आरोपही सामनाने केला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 22, 2025
- 12:28 pm
Maharashtra Local Body Election : तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट… एकमेकांविरोधात लढलात कशाला? राऊतांचा महायुतीवर निशाणा
संजय राऊत यांनी महायुतीला स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध लढण्याबाबत प्रश्न विचारला. त्यांनी निवडणूक खर्चातील गैरव्यवहाराचा आरोप करत मशीन सेटिंगवरही बोट ठेवले. तसेच, महाविकास आघाडीत काँग्रेसला घेण्याचे प्रयत्न आणि शिवसेना (उबाठा)-मनसे युतीची अंतिम बैठक झाल्याचे स्पष्ट केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 21, 2025
- 4:22 pm
BMC Election 2025 : संजय राऊत पुन्हा ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरे यांच्यासोबत युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आगामी बीएमसी निवडणुका आणि जागावाटपाच्या मुद्द्यांवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील संभाव्य युती आणि त्यातील जागावाटपाचा तिढा सोडवण्यावर या बैठकीत चर्चा झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 20, 2025
- 3:27 pm
Saamana : एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार, हे भूत कोणाच्या मानगुटीवर बसतं… सामनातून सरकारवर निशाणा
सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून एप्स्टिन कांडामुळे भारतात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असा दावा करण्यात आला आहे. जेफ्री एप्स्टिनचे भूत १९ डिसेंबरला अमेरिकन संसदेतील फायलींमधून बाहेर पडेल आणि भारतात येऊन कोणाच्या मानगुटीवर बसते, हे पाहावे लागेल, असे सामनामध्ये म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा हवाला देत पंतप्रधानांमध्ये बदल होण्याची शक्यताही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 19, 2025
- 11:56 am
शिंदे प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी वाटणार, राऊतांचा खळबळजनक दावा!
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांचे महापालिकेचे बजेट हे दहा हजार कोटी रुपये आहे, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 18, 2025
- 8:06 pm
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत, शिंदे-पवार गट भाजपला पराभूत करू शकत नाही, असे म्हटले. केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन भाजपला हरवू शकतील, असे राऊतांनी स्पष्ट केले.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 18, 2025
- 12:27 pm